गेल्या अनेक दिवसांपासून चच्रेचा विषय ठरलेली मुंबई विद्यापीठाची स्टुडंट कॉन्सिलच निवडणुक शनिवारी पुन्हा एकदा वादाच्या भोवरयात अडकली. शनिवारी मुंबई विद्यापीठात पार पडलेल्या या निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदासाठी सादर केलेल्या अर्जातील तीन मुद्यांबाबत शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आता हा मुद्दा मुंबई विद्यापीठाच्या विधी सल्लागारांच्या कोर्टात पाठविण्यात आला असून येत्या आठवडय़ात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कॉन्सिलच्या अध्यक्ष आणि सचिव पदासाठी येत्या १५ जानेवारीला निवडणुक होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर मनविसेकडून अध्यक्षपदासाठी पी.डी.लायन्स कॉलेजच्या रेश्मा पाटील हिला उमेदवारी देण्यात आली असून सचिव पदासाठी सीएचएम कॉलेजच्या पियुष झेंडे याने अर्ज भरला होता.  तर दुसरीकडे ‘एनएसयुआय’तर्फे बीएड कॉलेजच्या स्वामी नंदिनी हिने अध्यक्षपदासाठी तर प्रणव भट याने सचिव पदासाठी अर्ज भरला होता.
दरम्यान, शनिवारी या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यावेळी मनविसेकडून ‘एनएसयुआय’च्या अध्यक्षपदासाठीच्या भरण्यात आलेल्या अर्जात तीन मुद्यांवर आक्षेप घेतला. उमेदवाराने हे अर्ज स्वत: भरावयाचे असताना तो अर्ज उमेदवाराने भरला नसल्याचा गौप्यस्फोट मनविसेतर्फे करण्यात आला असून उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या ओळखपत्रात त्याची स्वाक्षरी नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्याचबरोबर जी कागदपत्रे सादर केली आहेत, ती ‘एसईओ’च्या माध्यमातून सत्यप्रत न करता सादर केल्याने त्यावर मनविसेने आक्षेप घेतला असल्याचे मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
मनविसेकडून तीन गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला असून हे अर्ज छाननीसाठी विधी सल्लागाराकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ. मृदल निळे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.