देश-विदेशातील पर्यटन व्यवसायाचा आवाका वाढत असून या क्षेत्रात नोकरी- व्यवसायाच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. त्याअनुषंगाने विविध संस्थांनी वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्याविषयी-
देशाच्या पर्यटन मंत्रालयाची ‘अतुल्य भारत ’ ही प्रचार मोहीम जोर धरू लागली आहे. अनेक नामवंत सेलिब्रेटीज त्यात चमकताना दिसतात. पर्यटनाद्वारे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिकाधिक सक्षम करता येते, याची जाणीव झाल्याने या व्यवसायाकडे अधिक डोळसपणे बघितले जात आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटन व्यवसायाने कात टाकली असून यात कामाच्या नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत आणि त्या संधी नीट पेलता याव्यात, म्हणून विविध तज्ज्ञांची आवश्यकता भासत आहेत. पर्यटन क्षेत्रासंबंधीचे काही अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट ही स्वायत्त संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन विभागांतर्गत कार्यरत आहे. पर्यटन अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात या संस्थेनं मानमरातब प्राप्त केला आहे. या संस्थेचे ग्वालियर, दिल्ली, भुवनेश्वर, नेल्लोर या ठिकाणी कॅम्पस आहेत. संस्थेचे काही अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम अँड ट्रॅव्हल, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनॅशनल टुरिझम बिझिनेस, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सíव्हसेस, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम अँड लिजर.
वैशिष्टय़े- उत्कृष्ट प्लेसमेंट सेवा, अत्याधुनिक सोई-सुविधा, देश-विदेशातील नामवंत कंपन्यांमध्ये संस्थेच्या उमेदवारांना संधी प्राप्त, आंतरारष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रात्यक्षिकांची संधी. या अभ्यासक्रमांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट अप्टिटय़ूड टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी. पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोिवदपुरी ग्वालियर, ४७४०११ दूरध्वनी-०७५१२४३७३००, फॅक्स-२३४५८२१ मेल- iitm@sancharnet.in, वेबसाईट- http://www.iittm.org

गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट :

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
  • डिप्लोमा इन टुरिझम अँड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला करता येतो. या अभ्यासक्रमाला संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे.
  • डिप्लोमा इन कस्टम क्लिअरन्स : या अभ्यासक्रमाला संस्थेमार्फत घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. तीन वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांलासुद्धा या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
  • डिप्लोमा इन टूर मॅनेजमेंट : या अभ्यासक्रमाला संस्थेमार्फत घेण्यात येणारी प्रवेशपरीक्षा आणि मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षांचा आहे. अर्हता-कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
  • डिप्लोमा इन टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट : या अभ्यासक्रमाला संस्थेमार्फत घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. अर्हता-कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. पत्ता- गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, कालिना कॅम्पस, सांताक्रुज पूर्व, मुंबई-४०००९८ दूरध्वनी-०२२- २६५ ३० २५८, मेल giceuom@
    vsnl.com वेबसाईट- http://www.mu.ac.in/garware

थॉमस कूक :

  • फाऊंडेशन/ कन्सल्टंट कोस्रेस
  • डोमेस्टिक सर्टििफकेट कोस्रेस इन माय इंडिया माय वे :
  • ट्रॅव्हल प्रोफेशनल प्रोग्रॅम- हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना थॉमस कूक कंपनीत संधी मिळू शकते.
  • सर्टििफकेट कोर्स इन वर्ल्ड टूर मॅनेजमेंट- टूर व्यवस्थापक होण्यासाठी आवश्यक असणारं कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे शिकवलं जातं. पत्ता- सेंटर ऑफ लìनग सेल, थॉमस कूक इंडिया लिमिटेड, कूक्स बििल्डग, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई. ४००००१. दूरध्वनी-०२२- ६६०९१३४७/१३९२ मेल- info@thomascookcool.com वेबसाईट – http://www.thomascook.in/co

बॅचलर ऑफ आर्ट इन इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन : कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट या संस्थेनं बॅचलर ऑफ आर्ट इन इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासकम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटच्या सहकार्यानं पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे-
कन्व्हेन्शन मॅनेजमेंट अँड सíव्हस, हॉस्पिटॅलिटी सेल्स अँड मार्केटिंग, सेक्युरिटी अँड लॉस प्रीव्हेंशन मॅनेजमेंट, रिसॉर्ट मॅनेजमेंट, सुपरव्हिजन इन द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, हाऊसकीिपग मॅनेजमेंट, ?? फूड प्रॉडक्शन प्रिन्सिपल्स आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या सहकार्यानं पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे- फौंडेशन कोर्स इन टुरिझम, मॅनेजमेंट इन टुरिझम, अंडरस्टँिडग इंटरनॅशनल टुरिस्ट. अर्हता- बारावी. पत्ता- १. बी.डब्ल्यू, पठार मार्ग, दादर-पश्चिम मुंबई-२८. दूरध्वनी- २४४ ५९ ८८४, २. कोहिनूर भवन, बीएसबी मार्ग, दादर-पश्चिम, मुंबई- ४०० ०२८, दूरध्वनी-२४३२७११५.

कुओनी अकादमी :

सर्टफिाइड कोर्स इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट- सहा महिने, अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. सर्टफिाईड कोर्स इन टूर गायिडग स्कील्स- तीन महिने. अर्हताको णत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. सर्टफिाईड प्रोग्रॅम इन ट्रॅव्हल एजन्सी ऑपरेशन्स- तीन महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.  सर्टफिाईड प्रोग्रॅम इन टुर मॅनेजर प्रोग्रॅम- तीन महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. सर्टफिाईड प्रोग्रॅम इन एअर टिकेटिंग स्पेश्ॉलिस्ट- चार महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. सर्टफिाईड प्रोग्रॅम इन एअर पोर्ट कस्टमर सíव्हस- तीन महिने. अर्हता- पदवी उत्तीर्ण.  सर्टफिाईड प्रोग्रॅम इन व्हिसा फॅसिलेशन- तीन महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. अ‍ॅडव्हान्स्ड सर्टफिाईड कोर्स इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट – एक वर्ष, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम- १ वर्ष, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पत्ता- औरम हाऊस, बाबुलनाथ मंदिर, मुंबई-४००००७ दूरध्वनी-०२२- ६१ ५७७९०० वेबसाईट- http://www.kuoniacademy.co.in

इंडिया इंटरनॅशनल ट्रेड सेंटर :
डिप्लोमा इन इंटरनॅशनल एअरलाइन्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट टुरिझम. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्ण. इंग्रजीवर प्रभुत्व- कालावधी- ४-५ महिने. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एव्हिएशन, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण उत्तीर्ण. इंग्रजीवर प्रभुत्व असल्यास उत्तम. कालावधी- १२ महिने डिप्लोमा इन इंटरनॅशनल एअर कार्गो अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, अर्हताको णत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण किंवा पदवी उत्तीर्ण. इंग्रजीवर प्रभुत्व असल्यास उत्तम. कालावधी- चार /पाच महिने ?? एअरलाइन केबिन क्रु, ट्रेिनग क्रु- अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. कालावधी- ४/५ महिने. पत्ता : ५९, नरिमन भवन, नरिमन पॉइंट मुंबई- २०. दूरध्वनी ०२२०२२२८०५५/ २२०२५२८६, ईमेल- iitc@indiatimes.com वेबसाइट- http://www.iitcworld.com