साहाय्यक शिक्षिका,  प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल, सानपाडा.
नवी मुंबई जिल्ह्य़ातील सानपाडा येथील विवेकानंद संकुल विद्यालयात ‘मागेल त्याला शिक्षण’ या ब्रीदवाक्याला न्याय देत खेडोपाडी शिक्षण पोहोचविणाऱ्या या शाळेविषयी..
नवी मुंबईतील विवेकानंद संकुल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाविषयी सकारात्मक दृष्टिकोन देऊन त्यांचा सर्वागीण विकास केला जातो.
आनंददायी शिक्षणास विविध उपक्रमांची जोड आहे. संस्कृती जतनासाठी आषाढी एकादशीदिवशी दिंडी काढली जाते. त्या दिंडीतून वृक्षपूजन, वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातो. या वेळी आयोजिल्या जाणाऱ्या कला, वक्तृत्व, क्रीडा, रक्षाबंधन कार्यक्रम, निबंध, प्रश्नमंजूषा अशा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण होतो. महापौर चषक स्पर्धेत, स्कॉलरशिप, टळर, ठळर. अशा विविध बाह्य़ परीक्षा स्पर्धामध्ये शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकतात. शाळेच्या स्नेहसंमेलनात शौर्यगाथा, संस्कृती, वर्षांऋतू महाराष्ट्राची सफर आदी विषय ठरवून त्यावर नाटक, नृत्य, स्वगत, विद्यार्थी सादर करतात. क्षेत्रभेटीमधून विद्यार्थ्यांना अढटउ मार्केट, बँका, बगिचा, अग्निशमन दल, वर्तमानपत्र प्रेस, दूध डेअरी, काच कारखाना ठिकाणी भेट देऊन तेथील कार्य कसे चालते याचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते. विविध देशांचे ध्वज, ऑलिंपिक, नाणी व त्यांचा इतिहास नैसर्गिक साधनसंपत्ती, औषधी वनस्पती इ. विषयांची माहिती मिळविणे, त्यांचे प्रदर्शन भरविणे आदी गोष्टींत विद्यार्थी सतत गर्क असतात. विविध शिबिरांचेही आयोजन शाळा करते ज्यातून विद्यार्थ्यांना हस्तकला, शिवणकाम, खेळ आकाशदर्शन, सावल्यांचे खेळ, रांगोळी, संगीत, पुस्तक परीक्षण आदी अनुभव दिले जातात. शाळेतील विद्यार्थी वर्गातील अभ्यासक्रम संगणक, छउऊ  प्रोजेक्टर, इंटरनेट याद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना अध्ययन, अनुभव देतात. विद्यार्थ्यांसाठी विविध व्याख्यानांसाठी मान्यवरांना आमंत्रित केले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन वीजबचत, आदी विषयांवर प्रबोधन केले जाते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित समस्यांवर प्रख्यात डॉक्टरांशी चर्चा, ऌकश् ची कारणे गैरसमज व उपाय यावर पालकांसाठी प्रकल्प तयार करणे, स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, पालकांसाठी कल्पतरू ग्रंथालय, भोंडला, मंगळागौर इ. सांस्कृतिक कार्यक्रम शाळा पालकांकरिता राबविते. ज्यातून पालक व समाजातील विविध घटक एकत्र येऊन विचारमंथन घडते व समाज शाळा यांची गुंफण दृढ होते. आजही शाळेचे माजी विद्यार्थी शाळेच्या कामात भावनिकदृष्टय़ा गुंतलेले दिसतात. १० वीसाठी करिअर मार्गदर्शन, रक्तदान शिबीर राबवतात. शाळेतून उडून गेलेली ही पाखरे चांगल्या विचारांनी शाळेकडे पुन्हा फिरताना दिसतात. शाळेच्या उपक्रमांतून मिळणाऱ्या यशाची हीच पावती आहे.