सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी.ची प्रवेश परीक्षा (पेट) १५ फेब्रुवारीला होणार असून त्याचे ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाले आहेत. या वर्षी पीएच.डी.साठी साधारण ४ हजार जागा उपलब्ध आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना १० जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जाची छापील प्रत देण्यासाठी १७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा १५ फेब्रुवारीला होणार असून परीक्षेच्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी १ हजार रुपये शुल्क आहे.
या वर्षी पीएच.डी.साठी विविध विद्याशाखांच्या ४ हजार ९६८ जागा उपलब्ध आहेत. व्यवस्थापन, औषधनिर्माण शास्त्र, तंत्रशिक्षण यांच्या जागा अधिक आहेत. परीक्षेची अधिक माहिती आणि प्रवेश अर्ज ६६६.४ल्ल्रस्र्४ल्ली.ूं.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.