News Flash

राज्यशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकेच नाहीत

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षण संस्थेतील(आयडॉल) एमए राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १६ एप्रिल पासून सुरू होणार असली तरी त्यांच्या हातात अद्याप कोणतीही

| April 13, 2015 03:15 am

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षण संस्थेतील(आयडॉल) एमए राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १६ एप्रिल पासून सुरू होणार असली तरी त्यांच्या हातात अद्याप कोणतीही पुस्तके मिळालेली नाही. यामुळे या परीक्षेसाठी बसलेल्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सुरू केली आहे. मात्र प्रशासन याबाबत सकारात्मक दिसत येत नसल्याने विद्यार्थ्यांवर ताण निर्माण झाला आहे.
अभ्यासक्रम व अभ्यासासाठीची पुस्तके नसल्यामुळे काही वर्षांपूर्वी ‘आयडॉल’ने राज्यशास्त्र शाखेतील एमएचे शिक्षण देणे बंद केले होते. मात्र या शाखेतील शिक्षणाची मागणी लक्षात घेऊन या शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरू केली. मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात ‘आयडॉल’ अपयशी ठरले आहे. एमएच्या प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर द्वितीय वर्षांच्या चारही विषयांना पुस्तके उपलब्ध नाहीत. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी वारंवार संस्थेत संपर्क साधला मात्र त्यांची दरवेळी निराशाच झाली. वर्षांअखेरीस जाहीर झालेल्या वेळापत्रकात या शाखेची परीक्षा १६ एप्रिल पासून सुरू होणार असल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांनी पुन्हा संस्थेशी संपर्क साधला. त्यावेळेस पुस्तके तयार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मग विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली. पण परीक्षा पुढे ढकलणे शक्य नसल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले. ज्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे त्या अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देणे ही ‘आयडॉल’ची जबाबदारी असून त्यात ‘आयडॉल’ अपयशी ठरल्याचे अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2015 3:15 am

Web Title: political science students without books in mumbai university
Next Stories
1 शिक्षकांनो एकत्र या..‘व्हॉट्सअ‍ॅप’वर!
2 ‘आवडीनुसार अभ्यासक्रम’ यंदापासूनच
3 शिक्षकांची भरती.. बेरोजगारांच्या यादीतच
Just Now!
X