राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या तंत्रनिकेतन अभ्यासक्रमातील ‘मॅथ्स १’ हा पेपर फुटल्याप्रकरणी शनिवारी आणखी एका आरोपीला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. राजेंद्र सुबराव पुरी (वय ३५, एन २, सिडको) असे त्याचे नाव आहे.
पेपरफुटी प्रकरणी सागर मनोज बावत याला गुरुवारी अटक करण्यात आली. पेपरफुटीच्या या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली. फुटलेल्या पेपरची चढय़ा दराने विद्यार्थ्यांमध्ये विक्री होत असल्याच्या प्रकारामुळे याची जोरदार चर्चा झाली.
दरम्यान, हा पेपर औरंगाबाद शहरातूनच फुटल्याची चर्चा असून राज्य तंत्रशिक्षण मंडळाने केलेल्या तपासणीत परीक्षा केंद्रातून हा पेपर फुटला नसल्याचे शुक्रवारीच स्पष्ट झाले. परंतु प्रश्नपत्रिकेचे पाकीट येथूनच गहाळ झाल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाल्याने मंडळाची डोकेदुखी
वाढली आहे.