नोव्हेंबर २०१४ मध्ये घेण्यात ‘चार्टर्ड अकाऊंटंट’(सीए) अंतिम परीक्षेत नंदूरबारचा संतोष नानकणी याने तिसरा क्रमांक पटकावला.
डिसेंबर २०१४मध्ये घेण्यात आलेल्या ‘कॉमन प्रोफिशिअन्सी टेस्ट’चा (सीपीटी) निकालही सोमवारी जाहीर करण्यात आला. सीए परीक्षेत विजेंदर अगरवाल (६९.७५ टक्के गुण) हा गुरगावचा विद्यार्थी पहिला आला आहे. तर अहमदाबादची पूजा परीक (६९.५०टक्के गुण)हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर नानकणी याच्याबरोबर हावडा येथील निकीता गोयल (६९.१३टक्के गुण) हिने तिसरी येण्याचा मान मिळविला आहे.
तसेच, सीपीटी परीक्षेत अव्वल कामगिरी करणाऱ्यांमध्ये विजयवाडा आणि गुंटूर येथील विद्यार्थी प्रामुख्याने आहेत.
सीएच्या दोन्ही गटांची परीक्षा दिलेल्या ३६,२५४ विद्यार्थ्यांपैकी ८.२३ टक्के म्हणजे २९८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीएची गट-१ची परीक्षा दिलेले ६४,९७२ पैकी २३.४१ टक्के म्हणजे १५,२०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर गट-२मध्ये ६६,५५२ पैकी १०.२६ टक्के म्हणजे ६,८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सीपीटीची परीक्षा देशभरातून १,००,९५७ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी १४.७५ टक्के म्हणजे १४,८९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ९,०६० विद्यार्थी असून विद्यार्थिनी १५.५५ टक्के आहेत. विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे.