News Flash

आरक्षित जागांवरील शाळा प्रवेशाची मुदत वाढवून देण्याची मागणी

शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित असलेल्या पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या मुदतीत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता होणे शक्य नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवावी.

| March 23, 2014 07:35 am

शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित असलेल्या पंचवीस टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी दिलेल्या मुदतीत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता होणे शक्य नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवावी. अशी मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचयतीने केली आहे.
नर्सरी, ज्युनियर केजी आणि पहिलीच्या वर्गातील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशप्रक्रिया २४ मार्चपासून ‘ऑनलाइन’ सुरू होणार आहे. २९ मार्चपर्यंत या प्रवेशांसाठी अर्ज भरता येणार आहेत. आरक्षणांतर्गत प्रवेश घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला देणे आवश्यक आहे. मात्र, अवघ्या आठ दिवसांमध्ये उत्पन्नाचा किंवा जातीचा दाखला मिळणे शक्य नसल्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचयतीने केली आहे.
‘उत्पन्नाचा दाखला हा आर्थिक वर्षांपुरता असतो. त्यामुळे अनेक पालकांनी अजून उत्पन्नाचे दाखले घेतलेले नाहीत. त्याचप्रमाणे अधिकारी निवडणुकीच्या कामामध्ये गुंतलेले असल्यामुळे पालकांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा कालावधी वाढवून देण्यात यावा,’ असे पंचायतीच्या स्वयंसेवकांनी म्हटल़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2014 7:35 am

Web Title: school reserve seats admission
Next Stories
1 विद्यापीठात ३७ कर्मचारी परीक्षा घेणार?
2 परीक्षा की मतदान जनजागृती?
3 खासगी शिक्षणसंस्थावर वचक ठेवण्याची गरज -सहारिया
Just Now!
X