राज्यातील एक लाखाहून अधिक शाळांपैकी फक्त ४ हजार ७१९ म्हणजे साधारण पाच टक्के शाळांनी गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व निकष पूर्ण केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेमध्ये पुरेशा भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. या भौतिक सुविधांचे १० निकष देण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ लाख ३ हजार ६२९ प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी साधारण पाच टक्के म्हणजे ४ हजार ७१९ शाळा सगळेच्या सगळे दहा निकष पूर्ण करत आहेत. राज्यातील ३४ शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही भौतिक सुविधा नाही. राज्यातली ३५ टक्के म्हणजे ३६ हजार ६९१ शाळा आठ निकष पूर्ण करत आहेत.