संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथे पार पडलेल्या ४० व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील चॅम्पियन चषकाचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाने पटकावला आहे.
प्राथमिक, माध्यमिक शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि प्रयोगशाळा साहाय्यकांनी केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांचे प्रदर्शन १७ ते २१ जानेवारी या काळात आंबवच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले. चार गटांमधून एकूण ४२६ प्रकल्प त्यामध्ये मांडण्यात आले. या स्पर्धात्मक प्रदर्शनाचा निकाल पुढील प्रमाणे –
प्राथमिक गट (विद्यार्थी) – १. मृण्मयी वालावलकर (सिंधुदुर्ग), २. दिव्या भूल (वर्धा), ३. रेणुकादास तेरखेडकर (रत्नागिरी), ४. राजलक्ष्मी नरोटे (सोलापूर). जयेश रुखमोडे (आदिवासी गट-गोंदिया). त्याचबरोबर आदित्य पोतदार (नंदुरबार), सायली घाडीगावकर (सिंधुदुर्ग), शंतनु असोडे (वर्धा), वैष्णवी कासराळे (लातूर) व स्वप्निल जंगम (पुणे) यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी १५०० रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
माध्यमिक गट (विद्यार्थी) – १. श्रेयस कुलकर्णी (नाशिक), २. जैधव मल्होत्रा (मुंबई), ३. निखिल खोमणे (पुणे), ४. ओंकार सुतार (कोल्हापूर). राजेंद्र चौहान (आदिवासी गट – पुणे) त्याचबरोबर प्रसाद भारती (अमरावती), प्रसाद जठार (पुणे), सिमरन वैद्य (मुंबई), समर्थ महाजन (जळगाव) व सौरभ किरुळकर (कोल्हापूर) यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी १५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या दोन्ही गटांमधून मिळून संपूर्ण स्पध्रेतील चॅम्पियन चषकाची मानकरी म्हणून कुडाळ हायस्कूलच्या मृण्मयी वालावलकरची निवड करण्यात आली.
प्रदर्शनाचे आयोजक प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, आमदार रामनाथ मोते इत्यादींच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.