महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे अर्ज भरण्याचे वेळापत्रक मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार असून यासाठी http://www.mahahsscboard.maharashtra.go या संकेतस्थळावर शाळांनी लॉगइन करावे, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शाळांच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी असेही मंडळाने नमूद केले आहे.
अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
*१० ते २० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्क भरून ऑनलाइन अर्ज सादर करावा.
*२१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.
*शाळांनी नियमित शुल्काची रक्कम २१ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत बँकेत जमा करावी. विलंब शुल्काची रक्कम २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबपर्यंत बँकेत भरावी.
*नियमित शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी २८ नोव्हेंबर रोजी, तर विलंब शुल्कासह अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी ५ डिसेंबर रोजी सादर करावी.