राज्यातील खालावलेल्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालावर अभ्यास गट नियुक्त करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. या अभ्यासानंतर शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नेमके काय करता येईल या बाबत निर्णय घेतला जाईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
देशभरातील शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकणारा ‘असर’ हा अहवाल नुकताच प्रथमने प्रकाशित केला. यात राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता खालावत चालल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. असरचा हा अहवाल दरवर्षी प्रसिध्द करण्यात येतो. या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेची वस्तुस्थिती स्पष्ट होते. शैक्षणिक गुणवत्ता कुठे कमी आहे हे दिसून येते.