जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी शनिवारी राज्यातील विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागण्यांवर आधारित अभ्यासक्रम चालवण्याचे आवाहन केले.
राजौरी येथील बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापीठाच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.
आगामी काळात जागतिक बाजारपेठेत नोकऱ्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी त्या तोडीचे अभ्यासक्रम आखून शैक्षणिक क्षेत्राने कात टाकली पाहिजे, असे ते म्हणाले.
तसेच सध्या ज्या व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना चांगली मागणी आहे त्यांचे संध्याकाळचे वर्गही सुरू करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 5:19 am