मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे ‘शेतीतील हितसंबंध, शेतीविषयक चळवळी आणि समकालीन ग्रामीण भारतातील ताणतणाव’ या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान विद्यापीठाच्या कलिना येथील ‘फिरोजशहा मेहता भवना’त हा परिसंवाद होईल.
परिसंवादात हरित क्रांतीचे मूल्यमापन, पर्यावरणातले बदल, शेतीमध्ये नव-उदारमतवादामुळे शिरकाव करणारी भांडवलशाही, सध्याच्या शेतीविषयक प्रश्नांची कारणे आणि परिणाम आणि शेतकरी चळवळीचे भवितव्य आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
या परिसंवादाचे उद्घाटन ‘माकपचे महासचिव प्रकाश करात यांच्या हस्ते होणार आहे. तर ‘अखिल भारतीय किसान सभे’चे अध्यक्ष एस. रामचंद्रन पिल्लई यांचे बीजभाषण होईल. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी डॉ. जोस जॉर्ज यांच्याशी ९९६९४२६३६० या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.