आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणार्या शासकीय तसचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा तसेच अन्य आर्थिक लाभ देण्यात येतात मात्र खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना या सवलतींपासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नागपूर विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, गांदिया व भंडारा हे चार जिल्हे आदिवासी असून नक्षलग्रस्त आहेत. या जिल्’ाांत काम करणार्या शासकीय कर्मचार्यांना एकस्तर वेतनश्रेणी तसेच प्रोत्साहन भत्ता, अतिरिक्त घरभाडे व अन्य आर्थिक लाभ देण्यात येतात. परंतु, खाजगी अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना एकस्तर वेतन श्रेणी आणि अन्य आर्थिक लाभांपासून वंचित ठेवले जात आहे.
याबाबतचा सकारात्मक विचार करून तसा शासन निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. याबाबत गेली अनेक वष्रे शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे.
मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील हजारो शिक्षकांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले.