News Flash

भाषा- १

प्रथम भाषेच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक या भागामध्ये आपण पाहणार आहोत उताऱ्याचे आकलन

| December 5, 2013 01:17 am

प्रथम भाषेच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे घटक या भागामध्ये आपण पाहणार आहोत
उताऱ्याचे आकलन
या प्रश्नामध्ये एखादा प्रसंग, घटना, छोटीशी कथा, वर्णनात्मक अथवा विचारप्रवर्तक परिच्छेद असतो. प्रथम उतारा एकाग्रचित्ताने समजून वाचून त्यातील घटना, प्रसंग यांचा क्रम लक्षात घ्या. प्रश्न आणि उत्तराचे चारही पर्याय नीट वाचा. पर्यायी उत्तरांबाबत संभ्रम असल्यास उताऱ्यातील नेमका संबंधित भाग व पर्याय पुन्हा वाचल्यास अचूक उत्तर निश्चित करता येते.
कवितेचे आकलन
कवितेतील लयबद्ध मांडणीतील मोजक्या शब्दात मोठा आशय दडलेला असतो. कवितेची मध्यवर्ती कल्पना व आशयघन ओळींचा अर्थ समजण्यासाठी कविता काळजीपूर्वक वाचा.
वर्ण विचार
१) भाषा- भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन
२) लिपी- आवाजांच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला लिपी म्हणतात.
३) देवनागरी- मराठी भाषेचे लेखन मराठी बालबोध लिपीत म्हणजेच देवानगरी लिपीत करतो.
४) व्याकरण-भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र.
५) वाक्य- प्रत्येक विचार पुऱ्या (पूर्ण) अर्थाचा करणारा शब्दसमूह
७) शब्द- ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा अर्थपूर्ण समूह
७) अक्षरे- ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणांना ‘अक्षरे’ म्हणतात. पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण, सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात.
८) स्वर- ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना ‘स्वर’ म्हणतात. स्वर एकूण २२ आहेत व स्वरादी २ आहेत.
९) व्यंजने- ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी ‘अ’ (परवर्ण) या स्वराचे साहाय्य घ्यावे लागते अशा वर्णाना व्यंजने म्हणतात. एकूण ३४ व्यंजने आहेत.
संधी – जोडशब्दामध्ये शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांत मिसळून त्या दोघांचा एक वर्ण तयार होतो. त्याला ‘संधी’ म्हणतात.
१) स्वरसंधी- दोन स्वर एकमेकांजवळ आल्यानंतर त्याचा एक स्वर होतो त्याला स्वरसंधी म्हणतात.
२) व्यंजनसंधी – जळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर आल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात.
३) विसर्गसंधी- एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असल्यास होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात.
म्हणी – दीर्घ अनुभवावर आधारित छोटे पण भरपूर अर्थ असलेले वाक्य म्हणजे ‘म्हण’ होय. म्हणी बोधप्रद, चटकदार आणि आटोपशीर असतात. त्यांची रचना यमकयुक्त, अनुप्रासयुक्त असते. त्यामुळे म्हणी सहज लक्षात राहतात.
वाक्प्रचार – वाक्प्रचारातील शब्दांना शब्दश: असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह होय. वाक्यप्रचाराच्या वापरामुळे भाषेचा विकास होतो.
लिंगविचार – एखादी वस्तू प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पुरुष जातीची किंवा स्त्री जातीची आहे किंवा दोन्हींपेक्षा वेगळ्या जातीची आहे हे तिच्या नामाच्या रुपावरून समजते, त्याला लिंग असे म्हणतात. निर्जीव वस्तूच्या बाबतीत पुरुषत्व किंवा स्त्रीत्व काल्पनिक असते. लिंगे तीन प्रकारची आहेत.  पुल्लिंग-  नामाच्या एकवचनी ‘तो’ शब्द लागू पडल्यास,  स्त्रीलिंग – ‘ती’ शब्द लागू पडल्यास, नपुसकलिंग – ‘ते’ शब्द लागू पडल्यास.
विरामचिन्हे – वाचताना वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी वाक्यात जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हणतात. पूर्णविराम (.), अर्धविराम (;), स्वल्पविराम (,), अपूर्ण विराम (:), प्रश्नचिन्ह (?), उद्गारचिन्ह (!), अवतरण चिन्हे (‘ ’, ‘‘ ’’), संयोग चिन्ह (-), अपसारण चिन्ह (स्पष्टीकरणासह (-), लोपचिन्ह (..), दंड (।।), अवग्रह (२), विकल्पचिन्ह (/)
शब्दांच्या जाती – शब्दांचे दोन प्रकार पडतात. विकारीशब्द किंवा सव्यय शब्द- शब्दांचा वाक्यात उपयोग करताना काही शब्दांच्या स्वरुपात कोणताही बदल होत नाही.
अविकारी शब्द किंवा अव्य शब्द- शब्दाचा वाक्यात उपयोग करताना शब्दांच्या स्वरुपात कोणताही बदल होत नाही. शब्दांच्या आठ जाती आहेत.
१) नाम – प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूचे किंवा गुणधर्माचे नाम.
२) सर्वनाम – नामाऐवजी वापरले जाणारे शब्द.
३) क्रियापद – क्रियेचा आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द.
४) क्रियाविशेषण अव्यय – क्रियेचे स्थळ-काळ, प्रमाण, रीत दर्शवणारा किंवा क्रियेची अधिक माहिती सांगणारा शब्द.
५) शब्दयोगी अव्यय- वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येणारा शब्द.
६) केवलप्रयोगी अव्यय – सहजपणे उद्गारातून भावना व्यक्त करणारा शब्द.
७) उभयान्वयी अव्यय – दोन शब्द वा दोन वाक्ये जोडणारा शब्द.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2013 1:17 am

Web Title: tet exam language 1
Next Stories
1 आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा १७ डिसेंबरपासून
2 विद्यार्थ्यांला शिवराळ भाषा वापरणे अंगाशी आले
3 तयारीचे ‘अबक’ तंत्र
Just Now!
X