यंदापासून  JEE MAIN चे गुण ग्राह्य धरणारी मात्र स्वत:ची स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबविणारी महत्त्वाची संस्था म्हणजे हैदराबाद स्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी.
हैदराबाद येथील द इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी ही संस्था स्वायत्त विद्यापीठ आहे. या संस्थेची स्थापना १९९६ साली करण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेसाठी आंध्रपदेश सरकारने साहाय्य केले आहे. या संस्थेच्या नियामक मंडळावर नामवंत उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ आणि सरकारी उच्चपदस्थ आहेत. संगणक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन या विषयांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन करण्यास विद्यार्थ्यांना वाव मिळावा, या मुख्य हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. समाजातील विविध समस्यांचे निराकरण करणाऱ्या आंतरशाखीय संशोधनाला या संस्थेत प्राधान्य दिले जाते. पदवी अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली जाते. अशा प्रकारची संधी इतर संस्थांमध्ये अभावानेच उपलब्ध करून दिली जाते. पाच वर्ष कालावधीचा डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीच्या शाखेत संशोधन आणि चांगल्या करियरसाठी उत्तम तयारी करून देत असतो. हा अभ्यासक्रम केल्यानंतर बी.टेक्. आणि एम.टेक्. या पदव्या दिल्या जातात.
प्रवेशासाठी उपयुक्त रँकिंग : या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, वायरलेस, कम्युनिकेशन, स्पीच प्रोसेसिंग, मशिन ट्रान्समिशन, सर्च इंजिन्स, कॉम्प्युटर व्हिजन, पॅटर्न रिकग्निशन, डाटाबेसेस, डाटा मायिनग, एम्बेडेड सिस्टिम्स, बायोइन्फम्रेशन या विषयांमध्ये संशोधनाला संधी मिळू शकते. JEE MAIN २०१३ मध्ये किमान सहा हजारांहून कमी रँक असलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
गेल्या दोन वर्षांतील (AIEEE मधील) प्रारंभीची आणि शेवटची रँकिंग विषय पुढीलप्रमाणे राहिल्या आहेत-
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअिरग- प्रारंभीची रँक- ८४, शेवटची रँक- ३११०. या
शाखेत ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड डिझाइन – प्रारंभीची रँक- ३१९९, शेवटची रँक- ४४५०. या शाखेत ३५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेश इंजिनीअिरग -प्रारंभीची रँक-८०३, शेवटची रँक- ४७८७. या शाखेत ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड
कम्युनिकेशन डिझाइन -प्रारंभीची रँक- ३४१६, शेवटची रँक- ५६२६. या शाखेत २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ?? बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स एॅण्ड कॉम्प्युटेशनल नॅचरल सायन्सेस- प्रारंभीची रँक-३३६३, शेवटची रँक- ५६८८. या शाखेत १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
३० विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेशपरीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. २० विद्यार्थ्यांना नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना, ऑलिम्पियाडमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित दिला जातो.
वसतिगृह : या संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या होस्टेलमध्ये राहणे बंधनकारक आहे. या संस्थेची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होते. या संस्थेत कोणत्याही प्रकारचे राखीव जागा नाहीत. सर्व जागा गुणवत्तेनुसार भरल्या जातात.
संस्थेचे अभ्यासक्रम : या संस्थेत तीन पद्धतीचे अभ्यासक्रम चालविले जातात-
पदवी अभ्यासक्रम-
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग. डय़ुएल डिग्री-
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन काम्प्युटर सायन्स.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग.
ट्रान्स डिसिप्लिनरी डय़ुएल डिग्री-
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन कॉम्प्युटेशनल लँग्वेज.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन कॉम्प्युटेशनल नॅचरल सायन्सेस.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन एक्झ्ॉक्ट ह्युमॅनिटीज. प्रवेश प्रक्रिया : JEE MAIN २०१३ गुणांवर आधारित पुढील शाखांमध्ये प्रवेश दिला जातो-
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन कॉम्प्युटर सायन्स.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन कॉम्प्युटेशनल नॅचरल सायन्सेस.
प्रवेश परीक्षा व मुलाखतीद्वारे पुढील शाखांमध्ये प्रवेश दिला जातो-
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन कॉम्प्युटेशनल लँग्वेज.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन एक्झ्ॉक्ट ह्युमॅनिटीज.
नॅशनल टॅलेन्ट सर्च एक्झामिनेशन/ किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना यामधील गुणांवर आधारित आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पियाडमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. मात्र अशा इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा दोन तास कालावधीची राहील. या परीक्षेत वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक पद्धतीचे प्रश्न राहतील. विद्यार्थ्यांची वैज्ञानिक वैचारिक क्षमता जाणून घेणारे प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन काम्प्युटर सायन्स
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च इन कॉम्पुटेशनल नॅचरल सायन्सेस. पत्ता- द इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी, गाचिबौली, हैदराबाद- ५०००३२ दूरध्वनी- ०४०६६५३१०००
वेबसाइट- http://www.iiit.ac.in  ई-मेल- ugadmissions@iiit.ac.in