26 November 2020

News Flash

शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाचा अर्ज करण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाबाबत काही आक्षेप असल्यास, पुनर्मूल्यांकन किंवा छायाप्रतीसाठी अर्ज करण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

| June 11, 2014 12:02 pm

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाबाबत काही आक्षेप असल्यास, पुनर्मूल्यांकन किंवा छायाप्रतीसाठी अर्ज करण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या वर्षी प्रथमच पुनर्मूल्यांकनाचे निकाल लावल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. निकालाबाबत काही आक्षेप असल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे. पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्यासाठी २४ जूनपर्यंत मुदत आहे. गुणपडताळणीचा निर्णय ३० दिवसांमध्ये मुख्याध्यापकांकडे कळवण्यात येणार आहे.
पुनर्मूल्यांकनासाठीचा अर्जाचा नमुना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निकालाबाबतचे आक्षेप किंवा पुनर्मूल्यांकन, छायाप्रतीसाठीचे अर्ज परिषदेकडे पोस्टाने पाठवायचे आहेत किंवा प्रत्यक्ष द्यायचे आहेत. पुनर्मूल्यांकन किंवा छायाप्रतीसाठीचे अर्ज आणि याबाबतची
अधिक माहिती परिषदेच्या http://www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2014 12:02 pm

Web Title: till 24 june revaluation date for scholarships exam
टॅग Revaluation
Next Stories
1 ‘दहावी’चा आसनक्रमांक घोळ सुटला
2 शिक्षण अधिकार कायद्यात भेदभाव
3 वैद्यकीयच्या ईबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अनुदान अपुरे
Just Now!
X