आदिवासी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धाना क्रीडा विभागाच्या स्पर्धाप्रमाणे दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. त्यामुळे आदिवासी क्षेत्रातील आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व करिअर विषयक योजनांचा लाभ मिळणार आहे.
आदिवासी खेळाडू विद्यार्थी हे आदिवासी विभागाने आयोजिलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होतात. मात्र, या स्पर्धाना क्रीडा संचालनालयाची मान्यता नव्हती. त्यामुळे या स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ वाढीव गुणांचा फायदा मिळत नव्हता. या संदर्भात तावडे यांच्याकडे लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटनांनी पाठपुरावा केला होता.