मुंबई विद्यापीठाच्या मरिन लाइन्स येथील क्रीडा संकुलातील स्टेडियमच्या नुतनीकरणासाठी काढण्यात आलेल्या टाकावू लोखंडाची चोरी करताना विद्यापीठाच्या एका खासगी सुरक्षा रक्षकाला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरिन लाइन्स येथील क्रीडा संकुलाच्या परिसरात प्र-कुलगुरूंचे निवासस्थान आहे. तेथे कामावर असलेल्या जेकब कोळी याने २६ फेब्रुवारी रोजी प्र-कुलगुरू यांच्या पत्नीला बाहेर जाण्यासाठी सहकारी सुरक्षा रक्षकास टॅक्सी आणण्यास सांगितले. सहकाऱ्याने टॅक्सी पाठवून दिल्यानंतर कोळी याने स्टेडियमच्या चार गोण्यांमध्ये भरलेले टाकाऊ लोखंड टॅक्सीमध्ये ठेवले. हा प्रकार विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने पाहिला व तेथे असलेले विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक कल्पेश महाडिक यांना माहिती दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 5, 2015 12:03 pm