Upsc Prelims Exam Practice and Preparation Tests peper1
Upsc, Upsc Prelims Exam
सामान्य अध्ययनावर आधारित बदललेल्या प्रश्नप्रकारानुसार निवडक प्रश्न पूर्वपरीक्षेच्या सरावासाठी देण्यात येत आहेत़ या सराव प्रश्नांची उत्तरे रविवारच्या अंकात प्रसिद्ध केली जातील़ विद्यार्थ्यांनी दिलेले प्रश्न स्वत: सोडवून उत्तरे पडताळावीत़
_______________________________________________
विषय- भारतीय राज्यपद्धती व राजकीय व्यवस्था
अचूक पर्याय निवडा़
प्र १ राष्ट्रीय आणीबाणीविषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
(अ) आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली आह़े
(ब) डॉ़ सर्वपल्ली राधाकृ ष्णन राष्ट्रपती असताना २६ ऑक्टोबर १९६२ रोजी बाह्य़ आक्रमण या कारणाने आणीबाणी लागू करण्यात आली होती़
(क ) राष्ट्रपती व्ही़ व्ही़ गिरी यांनी ३ डिसेंबर १९७१ रोजी बाह्य़ आक्रमण या कारणाने आणीबाणी जाहीर केली होती़
(ड) राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी २६ जून १९७५ रोजी अंतर्गत अशांतता या कारणाने आणीबाणी जाहीर केली होती़
पर्याय- (१)अ क ड, (२)ब क ड,
(३)अ ब, (४)अ ब क ड.
प्र २ विधान परिषदेसंदर्भात योग्य विधान/विधाने निवडा़
(अ) राज्य घटनेतील कलम १६९नुसार राज्यविधानसभा विशेष बहुमताने ठराव पास करून विधान परिषद निर्माण अथवा
बरखास्त करू शकत़े
(ब) विधान परिषदेत कमीत कमी ४० व जास्तीत जास्त त्या विधानसभेच्या सदस्य १/३ इतके सदस्य असतात़
(क) सर्वसाधारण विधेयक विधान परिषद ४ महिन्यांपर्यंत विलंबित ठेवू शकत़े
(ड) धनविधेयक या सभागृहात मांडता येत नाही़
पर्याय- (१) अ ब क, (२) अ ब क ड,
(३) ब क ड, (४) ब ड़
प्र ३ भारतीय राज्यघटनेचा सरनामा खालीलपैकी कशाची हमी देतो?
(अ) सर्व नागरिकांना मूलभूत हक्क.
(ब) सर्व व्यक्तींना मुलभूत हक्क.
(क) व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता़
(ड) सर्व नागरिकांना मूलभूत कर्तव्य़े योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा़
प्र ४  संघराज्य व घटकराज्यांमधील वाद सोडविण्याचा अधिकार फक्त सवरेच्य न्यायालयाला असतो़ हा
अधिकार ……….. प्रकारात मोडतो़
 (अ) सल्लाविषयक अधिकार क्षेत्ऱ
 (ब) अपिलाचे अधिकारक्षेत्ऱ
 (क) प्रारंभिक अधिकार क्षेत्ऱ
 (ड) न्यायिक पुनर्विलोकनाचे अधिकार क्षेत्ऱ
 प्र ५ राज्य घटनेतील कलम ………. नुसार राज्यपालास राज्य विधानसभेत एका अ‍ॅग्लो इंडियन सभासदाची नियुक्ती करता येत़े
पर्याय-(१) ३३२, (२) ३३३, (३) ३३०, (४) ३३१.
—————————–
प्र ६ कालानुसार मांडणी करा़
(अ) दुसरी गोलमेज परिषद़ (ब) गांधी आयर्विन कराऱ
(क) पुणे करार (ड) जातीय निवाडा़
पर्याय- (१) ब, अ, ड, क (२) अ, ब, क, ड
(३) अ, क, अ, ड (४) ब, अ, क, ड ‘
अचूक पर्याय निवडा़
प्र ७ ‘द हाय कास्ट हिंदू वुमन’ या पुस्तकाच्या लेखिका कोण?
पर्याय-(अ) पंडिता रमाबाई (ब) रमाबाई रानडे
(क) अ‍ॅनी बेझंट (ड) सरोजिनी नायडू़
प्र ८ रवींद्रनाथ टागोरांनी ‘सर’ या पदवीचा त्याग कोणत्या घटनेच्या निषेधार्थ केला होता?
(अ) बंगालची फाळणी़ (ब) खिलाफत अन्याय़
(क) जालियनवाला बाग हत्याकांड़
(ड) बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात़
(क्रमश:)