वाढवण्यासाठी यूजीसीचे प्रयत्न
महिलांचा उच्च शिक्षणातील प्रशासकीय कामकाजातील आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढावा यादृष्टीने आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पावले उचलली असून त्यासाठी यूजीसीने ‘कपॅसिटी बिल्डिंग फॉर वुमेन मॅनेजर्स इन हायर एज्युकेशन’ ही योजना तयार केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेचा सध्या शेवटचा टप्पा आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विद्यापीठातील आणि पर्यायी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी यूजीसीने विद्यापीठांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. या योजनेअंतर्गत विद्यापीठांनी महिलांसाठी कार्यशाळा, व्याख्याने अशा उपक्रमांचे आयोजन करायचे आहे.  विद्यापीठांना या योजनेअंतर्गत ११ कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढावा या दृष्टीने यूजीसीच्यावतीनेही महिला अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ या योजनेच्या समन्वयाचे काम पाहात आहे.    

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन