योगाभ्यासाचा वाढता कल लक्षात घेता देशभरातील विविध संस्थांमध्ये योगप्रशिक्षणाचे रीतसर
अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. योगाभ्यासाच्या विविध अभ्यासक्रमांची सविस्तर ओळख-
योगाभ्यासाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन याकडे करिअर म्हणून पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. योगप्रशिक्षण अभ्यासक्रमांची ही सविस्तर माहिती-
 बॅचलर ऑफ सायन्स इन योग सायन्स :
योग प्रशिक्षणासाठी भारत सरकारने मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग ही संस्था स्थापन केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत अशी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने बॅचलर ऑफ सायन्स इन योग सायन्स हा तीन र्वष कालावधीचा आणि सहा सत्रांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. योग विषयाशी निगडित ज्ञान, कौशल्य आणि तंत्र या अभ्यासक्रमाद्वारे शिकवले जाते. हा अभ्यासक्रम दिल्लीच्या गुरु गोविंदसिंघ इंद्रप्रस्थ विद्यापीठाशी संलग्न आहे.
अर्हता- या अभ्यासक्रमाला बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. या विद्यार्थ्यांना या तीनही विषयात सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत. तसेच या तीनही विषयात स्वंतत्रपणे उत्तीर्ण होणं आवश्यक ठरतं. या अभ्यासक्रमाला प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय एक ऑगस्ट २०१३ रोजी २१ वर्षांपेक्षा अधिक असू नये. या अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवला जातो.
विद्यार्थ्यांची निवड बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाते. या अभ्यासक्रमाची प्रवेश फी एक हजार रुपये असून ती पहिल्या वर्षीच भरावी लागते. दरवर्षीचे शिक्षण शुल्क सहा हजार रुपये आहे.
 संस्थेचे इतर अभ्यासक्रम :
* डिप्लोमा इन योग स्टडीज :
या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष आहे. खुल्या संवर्गातील कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो. अनुसूचित जातीज मातीच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे वयोमर्यादा- ३० वर्ष. ११५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रम इंग्रजी आणि हिंदीतून शिकवला जातो.
एकूण जागा ७५.
* डिप्लोमा इन योग थेरेपी :
अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्ष. ५० टक्के गुणांसह विज्ञानपदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो. वयोमर्यादा ३५, एकूण जागा- २५. अर्ज आणि माहितीपत्रक http://www.yogamdniy.com या वेबसाइटवर ठेवण्यात आले आहे. 
पत्ता- ६८, अशोक रोड, नियर गोले डाक खाना, न्यू दिल्ली११०००१, दूरध्वनी- २३७३०४१७/१८, फॅक्स- २३७११६५७ मेल- http://www.yogamdniy.com
 बॅचरल ऑफ सायन्स इन योग अँड कॉन्शसनेस : स्वामी
विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटीने सुरू केलेले अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* बॅचरल ऑफ सायन्स इन योग अँड कॉन्शसनेस :
अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी, कालावधी- ३ वर्षे.
* मास्टर ऑफ सायन्स इन योग अँड कॉन्शसनेस :
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- २ वर्षे.
* बॅचरल ऑफ सायन्स इन नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स :
अर्हता- जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयासंह बारावी, कालावधी- ५.५ वर्षे.
* मास्टर ऑफ फिलासॉफी इन योग थेरपी अँड कौन्सेलिंग :
अर्हता- कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी, कालावधी २ वर्षे.
* डॉक्टरल ऑफ मेडिसिन इन योग अँड रिहॅबिलिटेशन :
अर्हता- वैद्यकीय विषयातील पदवी, कालावधी- ३ वर्षे.
* बॅचरल ऑफ सायन्स इन योग अँड मॅनेजमेंट :
अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी, कालावधी- ३ वर्षे.
* मास्टर ऑफ सायन्स इन योग अँड मॅनेजमेंट :
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- ३ वर्षे.
* मास्टर ऑफ फिलोसॉफी इन योग अँड मॅनेजमेंट :
अर्हता- कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी, कालावधी २ वर्षे.
* बॅचरल ऑफ आर्ट इन योग :
जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन, अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी, कालावधी- ३ वर्षे.
* डॉक्टरल डिग्री इन योग :
अर्हता- अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय विषयातील पदवी/ किंवा मानसशास्त्र, क्लिनिकल सायकालॉजी, कौन्सेलिंग सायकालॉजी, सायकालॉजिकल रिहॅबिलिटेशन आणि योग सायकॉलॉजी या पकी कोणत्याही एका विषयातील पदव्युत्तर पदवी कालावधी- ३ वष्रे. वरील सर्व अभ्यासक्रम हे निवासी स्वरूपाचे आहेत. यासोबत..
* बॅचरल ऑफ सायन्स इन योग :
अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी, कालावधी- ३ वर्षे
* मास्टर ऑफ सायन्स इन योग :
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, कालावधी- २ वर्षे हे अनिवासी स्वरूपाचे अभ्यासक्रमसुद्धा करता येतात. या संस्थेने पुढील प्रमाणपत्र, पदविका आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
* डिप्लोमा इन योगिक सायन्स :
अर्हता- दहावी, कालावधी- २ वर्षे.
* डिप्लोमा इन नॅचरोपॅथी अँड योग थेरपी :
अर्हता- बारावी, कालावधी- २ वर्षे आणि सहा महिने.
* डिप्लोमा इन योग अँड नर्सिंग :
अर्हता- बारावी, कालावधी- २ वर्ष आणि सहा महिने.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी :
अर्हता- पदवी, कालावधी- १ वर्ष.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरेपी फॉर डॉक्टर्स-
अर्हता- वैद्यकीय पदवी, कालावधी- १ वर्ष.
* योग इन्स्ट्रक्टर कोर्स- अर्हता- बारावी, कालावधी- साडे चार महिने. पत्ता- स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था युनिव्हर्सिटी, वेबसाईट- http://www.svyasa.org दूरध्वनी०८०- २६६१२६६९ फॅक्स-२६६० ८६४५.
(पूर्वार्ध)

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’