17 October 2019

News Flash

‘झेप’ घ्या यशाच्या शिखरांकडे..

आजच्या महत्त्वाकांक्षी तरुणाईसमोरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल, तर तो करिअरचा. या प्रश्नाच्या उत्तराकडील प्रवासात ‘लोकसत्ता’चा ‘करिअर

| December 22, 2013 03:27 am

आजच्या महत्त्वाकांक्षी तरुणाईसमोरील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल, तर तो करिअरचा. या प्रश्नाच्या उत्तराकडील प्रवासात ‘लोकसत्ता’चा ‘करिअर वृत्तान्त’ नेहमीच दीपस्तंभासारखा ठरला आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांतून उच्च पदांची आस धरणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ‘लोकसत्ता’चा रोजचा अंक हाही एक खात्रीचा मार्गदर्शक ठरलेला आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून आता ‘युनिक अॅकॅडमी प्रस्तुत लोकसत्ता झेप’ हा माहितीपूर्ण संवादाचा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. ‘लोकसत्ता झेप’ या उपक्रमांतर्गत दर महिन्याला होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तज्ज्ञ आणि जाणकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मुंबई आणि पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमातील पहिला कार्यक्रम मुंबईत येत्या २८ डिसेंबर रोजी होणार असून, त्याचा विषय आहे – ‘राज्य नागरी सेवांमधील संधी!’  
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरमध्ये २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात कष्टसाध्य असणाऱ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १६ वे आलेले उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, मार्गदर्शक भूषण देशमुख.
 विश्वास नांगरे-पाटील हे ‘नागरी सेवांमध्ये यश कसे मिळवावे’, तर डॉ. खल्लाळ ‘परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी आणि त्यात यश कसे मिळवावे’ हे सांगणार असून, ‘परीक्षेला कसे सामोरे जावे’ या विषयावर भूषण देशमुख संवाद साधतील.
या कार्यक्रमाचे प्रवेश शुल्क ३० रुपये आहे. प्रवेशिका रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी; ‘लोकसत्ता’ कार्यालय, दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई; ‘लोकसत्ता’ कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेच्या वर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.) येथे येथे उपलब्ध आहेत.  प्रवेशिका २३ डिसेंबरपासून सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध होतील.

First Published on December 22, 2013 3:27 am

Web Title: zep a loksatta initiative for candidates preparing for competitive exams
टॅग Competitive Exams