scorecardresearch

बारावीचा आज ऑनलाइन निकाल

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे घेण्यात आलेल्या मार्च, २०१४च्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी (२जून) ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

बारावीचा आज ऑनलाइन निकाल

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे घेण्यात आलेल्या मार्च, २०१४च्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी (२जून) ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
दुपारी १ वाजता  http://www.mahresult.nic.in, http://www.maharashtraeducation.com, http://www.hscresult.mkcl.org, http://www.rediff.com/exams या संकेतस्थळांवर हा निकाल पाहता येईल. या शिवाय सेलफोनने ‘बीएसएनएल’च्या ५७७६६ (महाराष्ट्र सर्कल) या क्रमांकावर MHHSC <seat no> असे टाईप करून पाठविल्यासही निकाल मिळू शकेल. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर केवळ विषयनिहाय गुण पाहता येईल. तसेच, या माहितीची प्रिंट आऊटही घेता येईल. प्रत्यक्ष गुणपत्रिका मात्र आठ दिवसांनी म्हणजे १० जून रोजी विद्यार्थ्यांच्या हाती पडेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा बारावीचा निकाल काहीसा विलंबाने जाहीर होत आहे. मात्र, या वर्षीपासून बारावीचे गुण पीसीएम या विषयगटाचे गुण राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशांकरिता ग्राह्य़ धरण्यात येणार असल्याने विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता या निकालाला महत्त्व आले आहे.ह्ण

पुढचे सोपस्कार
*मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीकरिता २० जूनपर्यंत अर्ज करायचा आहे.
*ऑक्टोबर, २०१४च्या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.
*उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीकरिता २ ते २१ जूनपर्यंत अर्ज करायचा आहे
*पुनर्मूल्यांकरिता छायाप्रत महत्त्वाची. छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसात विभागीय मंडळाकडे अर्ज करणे बंधनकारक
यांची मदत घ्या
मुंबई मंडळाची हेल्पलाईन – २७८९३७५६
मुंबईतील गरजू विद्यार्थ्यांकरिता समुपदेशकांची हेल्पलाईन
वि. वि. शिंदे – ९८२००७३७८२
ए. डी.सरोदे- ९३२२५२७०७६
स्मि. न. शिपुरकर – ९८१९०१६२७०
संजय चौधरी – ९८६९०२२२२४
मुरलीधर मोरे – ९३२२१०५६१८
विकास जाधव – ९८६७८७४६२३, ९९६७९३७१११
बी.के. हयाळीज – ९४२३९४७२६६
अनिलकुमार गाढे-९९६९०३८०२०
चं.ज. मुंढे – ९८६९३०७६५७
ज.पा. घाडगे झ्र् ९८६७९०६१२९

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज ( Kgtocollege ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या