अलीकडेदेखण्या, भव्य-दिव्य समारंभांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे या समारंभांचे नेटके आयोजन आणि व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींची गरजही दुणावत आहे. यासंबंधीचे प्रशिक्षण इव्हेन्ट मॅनेजमेन्ट विषयक अभ्यासक्रमांमध्ये मिळते. त्यासंबंधीची माहिती-
अलीकडे होणारे असंख्य सोहळे लक्षात राहतात, ते त्यांच्या नेत्रदीपक आयोजनामुळं. कार्यक्रमांचे सादरीकरण दिवसेंदिवस मोहवणारे असते. चित्रपट पुरस्कार, स्टेज शोज, फॅशन शोज, गीतसंगीताचे कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन आणि आतालग्नसमारंभांचे आयोजनसुद्धा इव्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपन्यांनी करण्याचा कल वाढत आहे. हे समारंभ किंवा प्रसंग उठावदार, दिमाखदार, नीटनेटके आणि लक्षात राहील असे व्हावेत, यासाठी इव्हेन्ट व्यवस्थापक प्रयत्नशील असतात.
 इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन :
इव्हेन्ट मॅनेजमेन्ट विषयाशी निगडित विविध अभ्यासक्रम इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन या संस्थेने सुरू
केले आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-  
लोअर परळ कॅम्पस :
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह ब्रॅण्ड कम्युनिकेशन. कालावधी- एक वर्ष. पूर्णवेळ अभ्यासक्रम.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हेशन. कालावधी- एक वर्ष. पूर्णवेळ अभ्यासक्रम.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन्स अ‍ॅण्ड कार्पोरेट कम्युनिकेशन. कालावधी- एक वर्ष. पूर्णवेळ अभ्यासक्रम.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन. कालावधी- एक वर्ष. अंशकालीन अभ्यासक्रम.
  वांद्रे कॅम्पस :
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट. कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.
* डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट. कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.
  जयिहद कॉलेज कॅम्पस :
* डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन्स अ‍ॅण्ड कार्पोरेट कम्युनिकेशन कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.
* डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड मीडिया. कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.
  वाशी कॅम्पस :
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हेशन. कालावधी- एक वर्ष. हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट. कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.
* डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट. कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.
  ठाणे कॅम्पस :
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हेशन. कालावधी- एक वर्ष. हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट. कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे.
* डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट. कालावधी- एक वर्ष. हा अभ्यासक्रम अंशकालीन आहे. ईमेल- mumbai@ emdiworld.com वेबसाइट- http://www.emdiworld.com
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट :
इव्हेन्ट मॅनेजमेन्टशी निगडित विविध अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट या संस्थेने सुरू केले आहेत. ही संस्था या विषयातील शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्थेपकी एक होय. या संस्थेच्या वतीने डिप्लोमा इन इव्हेन्ट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी ११ महिन्यांचा आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. याच संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट्स हा एक वर्ष कालावधीचा अंशकालीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायजिंग, मीडिया अ‍ॅण्ड इव्हेन्ट मॅनेजमेन्ट हा एक वर्ष कालावधीचा पूर्णकालीन अभ्यासक्रमही सुरू केला आहे. वेबसाइट www. niemindia.com, ईमेल- suport@neimindia

नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इव्हेन्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड डेव्हलपमेन्ट :
या संस्थेने इव्हेन्ट मॅनेजमेन्ट, जनसंपर्क या विषयांशी निगडित पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. जाहिरात, ब्रॅन्ड मॅनेजमेन्ट, मीडिया मॅनेजमेन्ट, टुरिझम मार्केटिंग, जनसंपर्क क्षेत्रात इव्हेन्ट मॅनेजमेंट कौशल्याचा वापर करण्याचे तंत्र सखोलपणे शिकवले जाते. संस्था वेळोवेळी लग्न सोहळा, खेळासंबंधित
इव्हेन्ट्स, डिजिटल मीडिया मार्केटिंग, लाइव्ह इव्हेन्ट्स अशा इव्हेन्ट्सचे प्रात्यक्षिक म्हणून कार्यशाळा आयोजित करीत असते. संस्थेमध्ये अशा इव्हेन्ट्सचे आयोजन करण्यात येऊन त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागाचा अनुभव दिला जातो.
  संस्थेचे अभ्यासक्रम- पदवीस्तरीय अभ्यासक्रम :
* बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन इव्हेन्ट
मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन्स : या अभ्यासक्रमाचा
कालावधी तीन वर्षे. हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. अर्हताको
णत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला
विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळाली आहे.
* डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन्स :
या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष असून हा अंशकालीन अभ्यासक्रम आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
* डिप्लोमा इन अ‍ॅस्पेक्ट्स ऑफ मीडिया, मार्केटिंग अ‍ॅण्ड इव्हेन्ट्स : या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. हा अंशकालीन अभ्यासक्रम आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
पदव्युत्तर अभ्यासक्रम :
* मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन इव्हेन्ट मॅनेजमेन्ट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन्स. या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षे. हा पूर्णकालीन अभ्यासक्रम आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील- पदवी.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेन्ट मॅनेजमेंट अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन्स. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. हा अंशकालीन अभ्यासक्रम आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील- पदवी.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅसपेक्ट्स ऑफ मीडिया,
मार्केटिंग अ‍ॅण्ड इव्हेन्ट्स. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. हा अंशकालीन अभ्यासक्रम आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील- पदवी. या संस्थेचे पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि पदविका अभ्यासक्रम हे भारतीयर विद्यापीठ, कोइम्बतूरमार्फत मान्यताप्राप्त आहेत. वेबसाइट- http://www.naemd.co ईमेल- mumbai@naemd.com
करिअरच्या संधी : इव्हेन्ट मॅनेजमेंट अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे संधी उपलब्ध होऊ शकतातइ व्हेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी, फॅशन हाऊस, मार्केटिंग कंपन्या, म्युझिक कंपन्या, टीव्ही चॅनेल्स, चित्रपट तसेच मालिका निर्मिती कंपन्या, शॉिपग मॉल्स, सुपर मार्केट्स, रेडिओ स्टेशन्स, स्टार हॉटेल्स, रिसॉर्ट्स, क्लब, स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपन्या, सुपर स्पेश्ॉलिटी हॉस्पिटल्स, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम कॅपन्या, शैक्षणिक संस्था, मीडिया- पब्लिकेशन्स, जनसंपर्क संस्था, वर्तमानपत्र उद्योग, कॉर्पोरेट हाऊसेस.