चित्रपटउद्योगाशी संबंधित मनोरंजनपर क्षेत्रांशी संबंधित शिक्षणक्रम राबविणाऱ्या खासगी
संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांची ओळख
जगातील ज्या काही मोजक्या देशांमध्ये चित्रपट, दूरचित्रवाणी, इंटरनेट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अतिशय झपाटय़ाने विस्तार होत आहे, त्यामध्ये आपला देश अर्थातच आघाडीवर आहे. देशात होणाऱ्या माध्यमक्रांतीमुळे करिअरच्या  असंख्य संधी उपलब्ध होत आहेत. कठोर परिश्रम करू शकणाऱ्या, सर्जनशील युवावर्गासाठी या क्षेत्रात उत्तमोत्तम संधी आहेत. चित्रपट, दूरचित्रवाणी, डिजिटल मीडिया आणि मुद्रित माध्यमांमध्ये करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील असे अभ्यासक्रम काही खासगी संस्थांनी सुरू केले आहेत. या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
 *  सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन :
सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सटिीच्या सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन या संस्थेने बॅचलर ऑफ मीडिया स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत जर्नालिझम, रेडिओ अ‍ॅण्ड टीव्ही प्रॉडक्शन, अ‍ॅडव्हर्टायजिंग, पब्लिक रिलेशन अ‍ॅण्ड इव्हेंट्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. या अभ्यासक्रमाला सिम्बॉयसिस एन्ट्रन्स टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो. पत्ता- सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सटिी, २३१, विमाननगर, पुणे-४११०१४. दूरध्वनी-०२०-२६६३४५११/ १२/१३. मेल- contactus@simcug.edu.in वेबसाइट- http://www.simcug.edu.in
 * मणिपाल विद्यापीठ :
मणिपाल विद्यापीठ ही आपल्या देशातील खासगी क्षेत्रातील महत्त्वाची शैक्षणिक संस्था होय. दर्जेदार शिक्षणासाठी या संस्थेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त केली आहे. माध्यमं आणि मनोरंजन या क्षेत्रातील करिअरच्या अनेक संधी लक्षात घेता या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- बॅचलर ऑफ सायन्स इन अॅनिमेशन, बॅचलर ऑफ सायन्स इन  व्हिज्युअल इफेक्ट्स, बॅचलर ऑफ सायन्स इन व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाइन, बॅचलर ऑफ सायन्स इन गेम आर्ट, बॅचलर ऑफ सायन्स इन न्यूज अॅण्ड इंटरअॅक्टिव्ह मीडिया, बॅचलर ऑफ सायन्स इन ग्रॅफिक डिझाइन. बॅचलर ऑफ आर्ट्स इन जर्नालिझम अॅण्ड कम्युनिकेशन स्टडीज. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी तीन वर्षे. अर्हता- बारावी उत्तीर्ण. वरील सर्व अभ्यासक्रम हे बंगळुरू केंद्रात करता येतात. संपर्क- मणिपाल युनिव्हर्सिटी, मणिपाल- ५७६१०४, कर्नाटक. वेबसाइट- http://www.manipal.edu
मेल- admissions@manipal.edu
अधिक माहितीसाठी संपर्कध्वनी- ९२४३७७७७११. या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्जसुद्धा भरता येतो. अर्ज व माहितीपत्रकासाठी ५०० रुपयांचा डीडी मनिपाल युनिव्हर्सिटी, मणिपाल किंवा उडिपी (कर्नाटक) या नावे काढून पाठवा. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सिंडिकेट बँकेच्या काही निवडक शाखांमध्येसुद्धा अर्ज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
* एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन :
एशियन अकॅडमी ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन ही संस्था गेल्या २० वर्षांपासून चित्रपट क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण प्रशिक्षण देते. आता या प्रशिक्षणामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. पदवी अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे.
तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम-
* बॅचलर ऑफ सायन्स इन मास कम्युनिकेशन, अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड जर्नालिझम (स्पेशलायझेशन इन सिनेमा).
* बॅचलर ऑफ सायन्स इन मास कम्युनिकेशन, अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड जर्नालिझम(स्पेशलायझेशन इन
मल्टिमीडिया).
* बॅचलर ऑफ सायन्स इन मास कम्युनिकेशन, अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड जर्नालिझम (स्पेशलायझेशन इन
इलेक्ट्रॉनिक मीडिया).
* बॅचलर ऑफ सायन्स इन मल्टिमीडिया अ‍ॅण्ड मल्टिमीडिया प्रॉडक्शन.
* बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन मीडिया मॅनेजमेंट
* बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) इन फिल्म अ‍ॅण्ड टीव्ही स्क्रीनरायटिंग.
* बॅचलर ऑफ आर्ट (ऑनर्स) इन फिल्म प्रॉडक्शन.
* बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) इन फिल्म इंटरनॅशनल जर्नालिझम.
सर्व अभ्यासक्रमांसाठी अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी  उत्तीर्ण. कालावधी- प्रत्येकी तीन वर्षे.
अल्पमुदतीचे अभ्यासक्रम : या संस्थेने काही अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- तीन महिने कालावधीचे अभ्यासक्रम- प्रॉडक्शन अ‍ॅण्ड डायरेक्शन अ‍ॅण्ड टीव्ही जर्नालिझम, व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅण्ड साऊंड रेकार्डिंग, कॅमेरा अ‍ॅण्ड लायटिनग टेक्निक, अ‍ॅक्टिग अ‍ॅण्ड प्रेझेंटेशन, टीव्ही ग्राफिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन, स्टिल फोटोग्रॉफी अ‍ॅण्ड जर्नालिझम,साउंड रेकॉर्डिंग अ‍ॅण्ड रेडिओ प्रॉडक्शन, मीडिया रिसर्च अ‍ॅण्ड
प्लॅनिंग, स्क्रीन प्ले रायटिंग, पिंट्र अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हर्टायजिंग ग्रॅफिक्स, टू डी ग्रॅफिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन, व्हच्र्युएल सेट डिझाइन (थ्री डी मॅक्स), थ्री डी ग्रॅफिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमेशन (एमएवायए), कंपोझिटिंग अ‍ॅण्ड स्पेशल इफेक्ट्स, इंटरनेट अ‍ॅण्ड वेब डिझाइन. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी. सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन महिने. पत्ता- एशियन अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन, मारवाह, स्टुडिओ कॉम्प्लेक्स, एफसी१६ए, नॉयडा (न्यू दिल्ली- एनसीआर) २०१३०१, दूरध्वनी०१२०- ४८३११००. ई-मेल- help@aaft.com वेबसाइट- http://www.aaft.com
*  व्हिसिलग वूड्स इंटरनॅशनल :
या संस्थेचे पुढील पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
* बॅचलर ऑफ सायन्स इन फिल्म मेकिंग. या अभ्यासक्रमांतर्गत सिनेमॅटॉग्रॅफी (चित्रपटछा याचित्रणकला), डायरेक्शन (दिग्दर्शन), एडिटिंग (संपादन), प्रॉडक्शन (निर्मिती), साऊंड रेकॉर्डिंग अॅण्ड
डिझाइन (ध्वनिमुद्रण आणि योजना) या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. हे अभ्यासक्रम तीन वर्षांचा आणि सहा सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणत: १४ ते १६ लाख रुपये.
* डिप्लोमा इन फिल्ममेकिंग – हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी
उत्तीर्ण. या अभ्यासक्रमांचे शुल्क साधारणत: १२ ते १४ लाख रुपये आहे. स्क्रीनरायटिंग या विषयातील
स्पेशलायझेशनची फी चार लाख रुपये आहे.
* डिप्लोमा इन स्क्रीनरायटिंग फॉर फिल्म- या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी
किंवा पदवी उत्तीर्ण. फी- दोन लाख रुपये.
* डिप्लोमा इन अॅक्टिंग- कालावधी एक वर्ष. फी- सात लाख रुपये.
* बॅचलर ऑफ सायन्स इन डिजिटल फिल्ममेकिंग.
कालावधी- तीन वर्षे. फी- १३ लाख ५० हजार रुपये. अर्हता- बारावी उत्तीर्ण. पत्ता- व्हिसिलग वूड्स इंटरनॅशनल, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६५. दूरध्वनी- ०२२३०९१६०००. ईमेल- counsellor@whistlingwoods.net वेबसाइट- http://www.whistlingwoods.net