‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’तर्फे (सीबीएसई) मार्च, २०१४मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा चेन्नई आणि तिरुअनंतपुरम विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येईल, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळांना हा निकाल सोमवारीच देण्यात आला. देशभरातून २२ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. http://www.results.nic.in, http://www.cbseresults.nic.inआणि http://www.cbse.nic.inया संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.