‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) आणि इतर व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्रवेश निश्चित करणाऱ्या कॅट (कॉमन अॅडमिशन टेस्ट) या प्रवेश परीक्षेचा निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. मात्र, निकालाची माहिती देणारे संकेतस्थळ बराच काळ ‘हँग’ राहिल्याने विद्यार्थ्यांना रात्री उशीरापर्यंत निकाल पाहण्यात अडचणी येत होत्या. निकाल समजून घेण्यात अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण होते. http://www.iimcat. com या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे.