‘एमईटी’चा व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

‘एमईटी’ या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेने नोकरी-व्यवसाय सांभाळून व्यवस्थापनाचे धडे गिरवण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी तीन वर्षांचा अर्धवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.

‘एमईटी’ या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेने नोकरी-व्यवसाय सांभाळून व्यवस्थापनाचे धडे गिरवण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी तीन वर्षांचा अर्धवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. मार्केटिंग, मनुष्यबळ विकास, अर्थव्यवस्थापन आणि माहिती व्यवस्थापन या विषयांसाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध असून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित आहे.  नोकरी-व्यवसाय न सोडता व्यवस्थापन पदवी घेऊ पाहणाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. प्रमाणित विद्यापीठातून कोणत्याही शाखांमधून पदवी घेणारे आणि कमीतकमी दोन वर्ष नोकरीचा अनुभव असणारे या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतात.
अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक आणि प्रवेश अर्ज ‘एमईटी’मध्ये उपलब्ध आहेत. किंवा  http://www.met.edu  या संकेतस्थळावरही प्रवेशअर्ज उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Met start master of management degree courses