यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे रविवार, २४ मे रोजी होणारी पीएचडीची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून नवीन वेळापत्रक १ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यापीठाने यंदा ४६ जागांसाठी पीएचडीचे अर्ज मागविले होते. याला विद्यार्थ्यांनी खूप प्रतिसाद दिला आहे. या जगांसाठी सुमारे १५०० हजार अर्ज दाखल झाल्याचे समजते.
मुक्त विद्यापीठाने यंदा नव्याने पीएचडी प्रवेश प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर अर्ज आले आहेत. ही प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी रविवारी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी स्पष्ट केले.
परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक १ जून रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.