राज्यात प्रथमच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. या परीक्षेची तयारी कशी करायची, शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये उजळणी कशी करायची, प्रत्यक्ष परीक्षा देताना काय काळजी घ्यायची, अडीच तासांमध्ये दीडशे प्रश्न कसे सोडवायचे, प्रत्येक विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा, या परीक्षेतून नेमके काय पाहिले जाणार आहे, अशा काही मुद्दय़ांचा आढावा आपण या सदरामध्ये घेऊ. सुरुवातीला या परीक्षेची प्राथमिक माहिती, अभ्यासक्रम, स्वरूप पाहू.
शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे. प्राथमिक स्तर (पेपर एक) आणि उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन). इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी प्राथमिक स्तराची आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी दुसरी परीक्षा आणि दोन्ही स्तरांवर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी दोन्ही पेपर देणे आवश्यक आहे. एक पेपर हा दीडशे (१५०) गुणांचा आहे. एका प्रश्नाला एक गुण या प्रमाणे दीडशे बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत.  या परीक्षेसाठी (निगेटिव्ह मार्किंग)ची पद्धत नाही. प्राथमिक स्तरावरील परीक्षेसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, प्रथम आणि द्वितीय भाषा, परिसर अभ्यास, गणित हे विषय आहेत. उच्च माध्यमिक स्तरावरील परीक्षेसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, दोन भाषा, गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे असे विषय आहेत. विषयांवर विचारण्यात आलेले प्रश्न हे पहिली ते बारावीच्या नियमित पाठय़पुस्तकांवर आधारित असतील, तर अध्यापन शास्त्रासंबंधीचे प्रश्न हे शिक्षणशास्त्र (डीएड, बीएड) विषयाच्या अभ्यासक्रमांवर असतील.
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – या विषयामध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी राहणार आहेत. प्राथमिक स्तरासाठी ६ ते ११ वर्षे व उच्च प्राथमिक स्तरासाठी ११ ते १४ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी प्रश्न असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्टय़े, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्टय़े यावर आधारित प्रश्नही असतील.
भाषा –  भाषिक कौशल्ये, व्याकरण, भाषेतील साहित्याचे प्राथमिक ज्ञान यावर आधारित प्रश्न या विभागामध्ये असतील. प्रथम भाषा आणि द्वितीय भाषेच्या निवडलेल्या पर्यायानुसार ती भाषा शिकवण्याची तंत्रे, प्राधान्यक्रम, वयोगटानुसार भाषेचे अध्यापन या मुद्दय़ांचीही चाचणी या परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.  
परिसर अभ्यास – परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संकल्पना व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्दय़ांवर आधारित प्रश्न असतील. हा विषय फक्त प्राथमिक स्तरावरील परीक्षेसाठी आहे.
गणित व विज्ञान – प्राथमिक स्तरावरील गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, ताíककता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्दय़ांवर आधारित असतील. उच्च प्राथमिक स्तरासाठी गणित व विज्ञान या दोन्ही विषयांचा मिळून एक गट आहे. दोन्ही विषयांना समान प्राधान्य देण्यात येणार आहे. उच्च प्राथमिक स्तरासाठी गणित व विज्ञान विषय गटासाठी  सामाजिक शास्त्रांच्या विषयाचा गट पर्याय म्हणून उपलब्ध आहे.
सामाजिक शास्त्र – यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे विषय आहेत. या सर्व विषयांमधील मूलभूत संकल्पना, आशय आणि अध्यापन तंत्र या मुद्दय़ांवरील प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
* प्राथमिक स्तर वेळ – २ तास ३० मिनिटे, एकूण गुण १५०
* बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र  – ३० गुण
* प्रथम भाषा – ३० गुण
* द्वितीय भाषा- ३० गुण
* गणित – ३० गुण
* परिसर अभ्यास – ३० गुण
* उच्च प्राथमिक स्तर – वेळ – २ तास ३० मिनिटे, एकूण गुण १५०
* बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र  – ३० गुण
* प्रथम भाषा – ३० गुण
* द्वितीय भाषा- ३० गुण
* गणित व विज्ञान  किंवा सामाजिक शास्त्रे – ६० गुण

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Nashik Education Department, Steps Up Efforts, Increase Voter, Turnout Through SVEEP Initiative, Systematic Voters Education and Electoral Participation program, students,
उन्हाळी सुट्टीतही एसव्हीईईपी उपक्रमासाठी धडपड
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार
cetcell latest marathi news, pune cetcell fee, one thousand fee cet cell marathi news
सीईटी सेलचा मोठा निर्णय : उत्तरतालिकांतील प्रश्नोत्तरांवर आक्षेप नोंदवण्यासाठी एक हजार रुपये शुल्क