निसर्गातील घडामोडींबद्दल ज्ञान मिळवणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे हे दोन भिन्न घटक आहेत. त्यापैकी पहिल्यास विज्ञान, तर दुसऱ्यास तंत्रज्ञान म्हणतात. मानवाने आपल्या जन्मापासूनच स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी काही विशेष तंत्रे विकसित केली. या तंत्रांनाच आपण तंत्रज्ञान म्हणत असतो. तंत्रज्ञान म्हणजे निसर्गावर मात करण्याचा व त्यासाठी उपयोगात आणलेल्या तंत्राचा वापर करण्याचा मार्ग होय.kg01
व्याख्या
१) थॉर्न क्राईड- औद्योगिक कलेचे विज्ञान म्हणजे तंत्रज्ञान.
२) एडवर्ड बोनो- ज्ञानाच्या उपयोजनातून काहीतरी उपयुक्त निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे तंत्रज्ञान होय.
शास्त्रज्ञांची ओळख
१) अ‍ॅरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४-३२२)
– निगमन तंत्रशास्त्राचे जनक
– जीवशास्त्राचे जनक
– प्राणिशास्त्राचे जनक
– ‘प्राणिसृष्टीचा इतिहास’ या ग्रंथाचे लेखन केले. – ‘उंचावरून पडणाऱ्या वस्तूचा वेग हा त्या वस्तूच्या वजनावर अवलंबून असतो,’ असा सिद्धांत मांडला.
२) युक्लीड (इ.स.पू. ३३०-२७५)
– भूमिती शास्त्रावर ‘एलिमेंट्स ऑफ जिओमेट्री’ हा ग्रंथ लिहून त्यातील मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या.
३) आर्किमिडिज
(इ.स.पू. २८७-२१२)
– सापेक्ष घनतेचा सिद्धांत मांडला. जेव्हा एखादी वस्तू द्रवात पूर्णत: किंवा अंशत: बुडते तेव्हा काही द्रव विस्थापित होतो. त्यामुळे वस्तूच्या वजनात घट होते. वस्तूच्या वजनात झालेली घट विस्थापित द्रवाच्या वजनाइतकी असते.  – तरणाचा नियम- तरंगणारी वस्तू तिच्या हवेतील वजनाइतका द्रव विस्थापित करते.  – तरतफेचे नियम मांडले.
४) क्लॉडियस
टॉलेमी  (इ.स. ९०-१६८)
– अल्माजेस्ट हा ग्रंथ लिहिला.
– भूकेंद्री सिद्धांत  मांडला. ग्रह स्वत:च्या परिवलनीय कक्षेत फिरतात.
५) कोपर्निकस
निकोलस (१४७३-१५४३)
–  सूर्यकेंद्री सिद्धांत- पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात.
– पृथ्वी स्वत:भोवती  फिरते व तिच्या परिवलनाचा कालावधी २४ तास आहे.
– विश्वाचा केंद्रबिंदू पृथ्वी नसून सूर्य आहे.
– खगोलशास्त्राचा जनक
६) गॅलिली गॅलिलिओ
(१५६४-१६४२)
– प्रायोगिक भौतिकशास्त्राचा जनक
– दुर्बिणीचा शोध लावला.  – जडत्वाची संकल्पना सर्वप्रथम मांडली. उंचावरून पडणाऱ्या वस्तूचा वेग हा वातावरणातील दाबावर अवलंबून असतो. – शुक्राच्या कला व गुरूच्या उपग्रहाचा शोध लावला.
७) आयझ्ॉक न्यूटन  (१६४२-१७२७)
– सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा जनक
– गुरुत्वाकर्षणाचा  नियम शोधून काढला.
– प्रकाशाचा कण सिद्धांत मांडला.
– त्याच्या मते पांढरा प्रकाश हा सात रंगांचे मिश्रण आहे. – प्रकाशाच्या वक्रीभवनाचा सिद्धांत  मांडला.
– वस्तूचे गतिविषयक नियम मांडले.
८) चार्ल्स डार्विन (१८०९-१८८२)
– मानवाच्या उत्क्रांतीसंबंधी सिद्धांत मांडला. – डार्विनच्या उत्क्रांतीवादातील  तीन महत्त्वाचे टप्पे- जीवनकलह, निसर्गाची निवड, परिवर्तनाचे तत्त्व
९) सिग्मंड फ्रॉईड (१८५६-१९३९)
– मानसशास्त्रातील मनोविश्लेषण शास्त्रांचा जनक. – लैंगिक भावनांचा मानवी वर्तन व विकृतीशी जवळचा संबंध. – सत्यसृष्टीतील अतृप्त आकांक्षा स्वप्नसृष्टीत तृप्त होतात.
१०) अल्बर्ट आईन्स्टाईन
(१८७९-१९५५)
सापेक्षता सिद्धांत मांडला. अंतर, काळ व गती या सापेक्ष संकल्पना आहेत.  -वस्तुमान व ऊर्जा यातील संबंध. ए= ेू2

महत्त्वाचे मुद्दे
*‘देवी’ या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली? -एडवर्ड जेन्नर
*सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात?- ७२
*मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? -३७ अंश सेल्सिअस
*कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वाना लागू पडते?- ‘ओ’
*‘पेनिसिलिन’चा शोध कोणी लावला?- सर अलेक्झांडर प्लेिमग
*सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला रोज किती कॅलरीजची जरुरी असते?- २५००
*पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली?- सॉल्क जोनास एडवर्ड
*‘होमिओपॅथी’चा शोध कोणी लावला? -सॅम्युअल हॅनेमन
*जगातील पहिली टेस्ट टय़ूब केव्हा व कोठे जन्मास आली? -१९७८, इंग्लंड.
*हृदयरोपण शस्त्रक्रिया भारतात प्रथम कोणी केली? -डॉ. पी. के. सेन
*‘इन्शुलिन’ या औषधाचा शोध कोणी लावला?- एफ. बॅटिंग
*कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो?- रेबीज
*सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्त्व मिळते? -जीवनसत्त्व ‘ड’
*मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते? -२०६
*मानवी शरीरातील स्नायूंची संख्या किती असते?- सुमारे ६३०
*रक्तगटाचा शोध कोणी लावला?- कार्ल लँडस्टीनर
*मानवी शरीरातील
छातीच्या बरगडय़ांची संख्या किती असते?- २४
*मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती असते? -३३
*वनस्पतींनाही भावना, संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ कोण? -जगदीशचंद्र बोस
*सर्वात हलका वायू कोणता?- हेलियम

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!