तंत्रज्ञानासंबंधित व्यावसायिक अभ्यासक्रम

कालौघात आवाका विस्तारलेल्या क्षेत्रांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे. लॅपटॉप असेंब्ली, मोबाइल दुरुस्ती, व्हेसल नेव्हिगेटर, ट्रेड युनियनिझम अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिलेशन्स यासारख्या तंत्रज्ञानाशी निगडित असलेल्या काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची ओळख

कालौघात आवाका विस्तारलेल्या क्षेत्रांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे. लॅपटॉप असेंब्ली, मोबाइल दुरुस्ती, व्हेसल नेव्हिगेटर, ट्रेड युनियनिझम अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिलेशन्स यासारख्या तंत्रज्ञानाशी निगडित असलेल्या काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची ओळख
डिप्लोमा कोर्स इन ट्रेड युनियनिझम अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिलेशन्स :
कामगार संघटनेत कार्यरत होण्यासाठी काही व्यावसायिक कौशल्ये आवश्यक असतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी डिप्लोमा कोर्स इन ट्रेड युनियनिझम अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिलेशन्स हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकेल. हा अभ्यासक्रम राज्य सरकारच्या इन्स्टिटय़ूट ऑफ लेबर स्टडीज या संस्थेने सुरू केला आहे. हा नऊ महिने कालावधीचा पूर्ण वेळेचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस करता येतो. कामगार संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असल्यास दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांससुद्धा या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
या अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०१३. अर्ज व माहितीपत्रकासाठी १० रुपयांचा मनीऑर्डर पाठवा. सोबत १२x२४ सेमी आकाराचा, ३० रुपयांची टपालतिकिटे लावलेला आणि स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा पाठवावा. पत्ता- रजिस्ट्रार, महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ लेबर स्टडीज, डी. सी. रोड, परळ, मुंबई-४०००१२.
  तंत्रज्ञानासंबंधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम :
केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल, अ‍ॅण्ड मीडियम एन्टरप्रायजेस मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या भुवनेश्वर स्थित सेन्ट्रल टूल रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेन्टर या संस्थेने उद्योगांच्या गरजा भागविणारे पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
* डिप्लोमा इन टूल अ‍ॅण्ड डाय मेकिंग : कालावधी- चार वर्षे. या अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमाची फी- ३० हजार रुपये. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयांसह ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. ही परीक्षा ७ जुल २०१३ रोजी घेतली जाईल. या परीक्षेत वस्तुनिष्ठ आणि दीघरेत्तरी प्रश्न विचारले जातील.
* डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स : कालावधी- ३ वर्षे,
सर्टिफिकेट कोर्स इन मशिन ऑपरेशन/ कालावधी- एक वर्ष/ फी- १६ हजार रुपये/ अर्हता- बारावी किंवा दहावी उत्तीर्ण, सर्टिफिकेट कोर्स इन टूल रूम मशिन/ कालावधी२ वर्षे/ फी- २० हजार रुपये. प्रवेश प्रक्रिया : अर्ज व माहितीपत्रकाची किंमत ५५० रुपये. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी २५० रुपये. या रकमेचा डिमांड डठाफ्ट सेन्ट्रल टूल रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेन्टर, भुवनेश्वर या नावे काढून पाठवा. डीडीसोबत स्वत:चा पत्ता लिहिलेला २०x२५ सेमी आकाराचा लिफाफा पाठवावा लागेल. अर्ज व माहितीपत्रक http://www.cttc.gov.in या वेबसाइटवर ठेवण्यात आला आहे. हा अर्ज डाऊनलोड करून ५०० रुपयांचा डिमांड डठाफ्ट पाठवावा लागेल. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी २०० रुपये. पत्ता- सेन्ट्रल टूल रूम अ‍ॅण्ड ट्रेनिंग सेन्टर, बी- ३६, चंडका इंडस्ट्रिअल एरिआ, भुवनेश्वर७५१०२४, दूरध्वनी- ०६७४-३०११७३३
  व्हेसल नेव्हिगेटर आणि मरीन फिटर :
केंद्र सरकारच्या सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज अ‍ॅण्ड इंजिनीअिरग ट्रेनिंग या संस्थेने व्हेसल नेविगेटर आणि मरीन फिटर हे दोन व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दोन वर्षांचा आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी प्रत्येकी ४८ विद्यार्थ्यांची निवड प्रवेशपरीक्षेद्वारे केली जाते. ही परीक्षा २२ जून २०१३ रोजी मुंबई, कोची, चेन्नई, विशाखापट्टणम येथे घेतली जाणार आहे. या अभ्यासक्रमांची संरचना ही नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग या संस्थेच्या कारागीर प्रशिक्षण योजनेशी करण्यात आली आहे.दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतात. या प्रशिक्षणात जहाजावरील प्रत्यक्ष प्रशिक्षणावर अधिक भर दिला जातो. दहावीत गणित आणि विज्ञान विषयात किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक. पत्ता- सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज अ‍ॅण्ड इंजिनीअिरग ट्रेनिंग फाइन आर्टस् अव्हेन्यू, कोची-६८२०१६, दूरध्वनी-०४८४-२३५१६१०.
ईमेल- cifnet@nic.in वेबसाइट- http://www.cifnet.in
  लॅपटॉप असेम्ब्ली व मेन्टनन्स :
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मुंबई स्थित शासकीय मुद्रण तंत्र संस्थेने लॅपटॉप असेम्ब्ली व मेन्टेनन्स हा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच ते सात दिवसांचा आहे. या अभ्यासक्रमाची फी साडेसहा हजार रुपये आहे. या अभ्यासक्रमात लॅपटॉपचे उन्नतीकरण (नूतनीकरण), जोडणी, डीव्हीडी रायटर बदलणे, आॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, विंडो विस्टा ऑपरेशन सिस्टमचे इन्स्टॉलेशन करणे आणि कार्यान्वयन, मदर बोर्डाची समस्या आदी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.
  मोबाइल दुरुस्ती आणि देखभाल :
याच संस्थेने सुरू केलेल्या या अभ्यासक्रमाचाही कालावधी पाच ते सात आठवडय़ांचा आहे. या अभ्यासक्रमात सिम कार्ड, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, असेम्ब्लिंग आणि डिअसेम्ब्लिंग, रिंगर प्रॉब्लेम, गेम आॉफ्टवेअर इन्स्टॉलमेन्ट, पॉवर ऑन आणि ऑफ, कीपॅड समस्या, चाìजग व बॅटरी समस्या, डिस्प्ले, अनलॉकिंग आणि फ्लॅशिग मोबाइल यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. पत्ता- शासकीय मुद्रण तंत्र संस्था, सर ज. जी. कला महाविद्यालय आवार, डॉ. डी. एन. रोड, छत्रपती टर्मिनससमोर, मुंबई-४००००१, दूरध्वनी-०२२-२२६२१४७४. ईमेल- gipt_m@rediffmail.com
  सीमॅन :
र्मचट शिपिंगमध्ये करिअर करण्यासाठी जीपी (जनरल परपज) रेटिंग कोर्स हा उपयुक्त ठरतो. जहाजाचे डेक आणि इंजिनच्या भागात लागणाऱ्या विविध प्रकारच्या कुशल तज्ज्ञांची निर्मिती करण्याच्या हेतूने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आली आहे. बारावी उतीर्ण उमेदवाराला हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमासाठी ५० टक्के जागा आयटीआय उमेदवारांसाठी राखीव आहेत. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय १ जुल २०१३ रोजी १७ वर्षे आणि ६ महिने असावे. सामायिक प्रवेश चाचणी शुल्क सर्वसाधारण गटासाठी-८०० रुपये. अनुसूचित जाती/ जमाती आणि महिला उमेदवारांसाठी ४०० रुपये. पत्ता- बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर सिफेअर्स ट्रस्ट, ३०३, मयूरेश चेम्बर, प्लॉट ६०, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर- पश्चिम, नवी मुंबई- ४०००७६, ईमेल seafareres. edu.in, वेबसाइट- http://www.seafareres.edu.in
दूरध्वनी-०२२-६७०३५१७०
  डेक कॅडेट :
समुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाईम स्टडीज या संस्थेने अनेक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत-
* बॅचरल ऑफ टेक्नॉलॉजी इन मरीन इंजिनीअिरग. या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे आणि प्रत्यक्ष जहावरचे सहा महिन्याचे प्रशिक्षण. अर्हता- बारावी विज्ञान परीक्षेत सरासरीने ६० टक्के गुण आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्येसुद्धा प्रत्येकी ६० टक्के गुण मिळायला हवेत. दहावी आणि बारावी परीक्षेत इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सटिी- सामायिक प्रवेश चाचणी घेतली जाते. अर्ज व माहितीपत्रक http://www.samudra.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
ईमेल- admissions.sims@samudra.com
दूरध्वनी-०२११४-३९९५००. पत्ता- समुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम स्टडीज, ताकवे खुर्द, मुंबई-पुणे हायवे- एनएच४, लोणावळा, जिल्हा पुणे-४१०४०५, दूरध्वनी-०२११४३९९५००, फॅक्स-३९९६००.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Technology related professional courses

ताज्या बातम्या