१) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात … ही शहरे प्रेसिडेन्सीच्या रूपाने नावारूपास आली.
ए) कलकत्ता, मुंबई, मद्रास,  बी) कलकत्ता, मुंबई, दिल्ली, सी)  मुंबई, दिल्ली, मद्रास, डी) मुंबई, मद्रास, सुरत
२) खाली दिलेल्या मुद्दय़ांची मदत घेऊन व्यक्ती ओळखा
(अ) त्यांनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक प्रकाशित  केलेkg01
(ब) ते सामाजिक कार्यकर्ते, लेखक, शिक्षक आणि स्वातंत्र्यसेनानी होते
(क) त्यांनी शेतसारा माफ करण्यासाठी शेतक ऱ्यांच्या सभा आणि मिरवणुका काढल्या
(ड) सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना ब्रिटिशांनी कारावासात पाठविले
ए) एन. जी. रंगा, बी) सानेगुरुजी, सी) शशिपद बॅनर्जी, डी) नारायण मेघाजी लोखंडे
३) खालीलपैकी कोणत्या व्यक्ती ‘चलो दिल्ली’ आणि ‘कदम कदम बढाए जा’ या विधानाशी संबंधित आहेत.
अ) गुरुबक्षसिंह धिल्ला, ब) वेदप्रकाश, क) कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन, ड) अरुणा अशफअली
ए) ब, क  बी) अ, ड     सी) अ, क  डी) अ, ब
४) डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे … या देशात स्थापन झालेल्या क्रांतिकारक संघटन सदस्य होते
ए) इंग्लंड, फ्रान्स  बी) जर्मनी, जपान  सी) रशिया, अफगाणिस्तान  डी) अमेरिका, कॅनडा
५) खालीलपैकी कोणत्या बाबी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाहीत?
ए) विटाळ विध्वंसन  बी) शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन  सी) जनता  डी) डिप्रेस्ड क्लासेस मिशन
६) खाली दिलेल्या विधानाशी संबंधित व्यक्ती ओळखा
अ) त्यांनी ब्रिटिश ट्रकपुढे हौतात्म्य स्वीकारले
ब) त्यांच्या हौतात्म्यामुळे राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा मिळाली
क) परदेशी कापडाच्या आयातीच्या विरोधात चळवळीत सक्रिय होते
ड) ते मुंबई गिरणी कामगार होते
ए) जगन्नाथ शिंदे  बी) बाबू गेनू  सी) चंद्रसिंग ठाकूर  डी) श्रीकृष्ण सारडा
७) काँग्रेस समाजवादी पक्षाच्या स्थापनेत सहभागी नसलेली व्यक्ती ओळखा
ए) मिनू मसानी  बी) जयप्रकाश नारायण    सी) निळकंठ जोगळेकर  डी) डॉ. राममनोहर लोहिया
८) मुंबई शहराच्या संदर्भात खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने चुकीची आहेत?
अ) हे ब्रिटिशांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते,
ब) १७८४ साली एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली,
क) १८५३ मध्ये कावासजी नॉना भॉय यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली,
ड) येथे शेतकऱ्यांनी १९१८ मध्ये साराबंदी चळवळ सुरू केली
ए) अ आणि ब, बी) क आणि ड, सी) अ आणि क, डी) ब आणि ड
९) दिलेल्या घटनांचा योग्य कालानुक्रम लावा
अ) वंगभंग आंदोलन, ब) होमरुल चळवळ, क) राष्ट्रीय सभेची स्थापना, ड) खिलाफत चळवळ
ए) क, अ, ब, ड,  बी) अ, ब, क, ड,  सी) ब, ड, क, अ,     डी) डी, ए, बी, सी
१०) खालीलपैकी कोणत्या जोडय़ा बरोबर आहेत?
अ)  १९०२- इंग्लंड व जपान मैत्री करार,  ब) १८०२- जर्मनी- ऑस्ट्रेलिया- इटली त्रिराष्ट्र मैत्री करार,  क) १९०७- इंग्लंड-रशिया मैत्री करार, ड) १८७०- इंग्लंड-रशिया मैत्री करार
ए) अ आणि क   बी) अ आणि ब   सी) अ, ब ,क आणि ड   डी) अ, ब आणि क
११) धारासना सत्याग्रहाविषयी खालील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्यायाची निवड करा
अ) सविनय कायदेभंग चळवळीमध्ये धारासना सत्याग्रह महत्त्वाचा होता
ब) या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले होते
क) सत्याग्रहींनी काही भागात शस्त्रे हाती घेतली
ए) अ आणि बी   बी) अ, ब, क   सी) ब आणि क   डी) अ आणि क
१२) वॉर्सा करारामध्ये समाविष्ट असलेले राष्ट्र खालीलपैकी कोणते?
ए) युक्रेन   बी) बग्लेरिया  सी) युगोस्लाव्हिया   डी) उझबेकिस्तान
१३) स्त्रियांच्या दयनीय स्थितीबाबत लिहिणाऱ्या महाराष्ट्रातील ….. आणि …. या होत्या
ए) कैलाशभाषिणी दोशी, सावित्रीबाई फुले   बी) ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले   सी) ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई   डी) ताराबाई शिंदे, कैलाशभाषिणी दोशी
१४) …… ही नागरिकांची प्राथमिक राजकीय कृती आहे
ए) राज्य कारभारावर चर्चा करणे   बी) समस्यांसंदर्भात  तक्रार करणे   सी) निवडणूक लढविणे  डी) मतदान  करणे
१५) आपला धर्म दुसऱ्याच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे अशा दाव्यामुळे कोणती समस्या निर्माण होते?
ए) जमातवाद   बी) दारिद्रय़   सी) शैक्षणिक संधीचा अभाव  डी) भाषावाद
१६) स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढावे यासाठी महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी काय उपाययोजना केली आहे?
ए) मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण  बी) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वासाठी ५० टक्के राखीव जागा   सी) स्त्रियांना मालमत्तेत समान वाटा  डी) शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आईचे नाव लिहिणे बंधनकारक
१७) संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य नाही?
ए) धार्मिक स्वातंत्र्य   बी) अवैध अटकेपासूनचे स्वातंत्र्य   सी) संचार न करण्याचे स्वातंत्र्य  डी) व्यवसाय स्वातंत्र्य
१८) देशात राज्यकारभार पारदर्शी होणे म्हणजे काय?
ए) नागरिकांचा सहभाग वाढणे बी) निवडणुकांमध्ये मतदान वाढणे     सी) दुर्बल घटकांचे सबलीकरण होणे  डी) शासन काय करत आहे हे नागरिकांना समजणे
१९) म.गांधीजींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन वर्णद्वेषाविरुद्ध लढा देणाऱ्या कोणत्या नेत्यास ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला?
ए) नेल्सन मंडेला   बी) यू.एन.आर. राव  सी) बराक ओबामा  डी) मार्टिन ल्युथर  किंग
२०) खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. त्यातील कोणती दोन विधाने भारताचे नि:शस्त्रीकरण धोरण व्यक्त करतात?
अ) अण्वस्त्रांचा प्रथम वापर नाही, ब) भविष्यात अणुचाचण्यांवर स्वयंघोषित बंदी, क) अण्वस्त्रांच्या साठय़ात वाढ, ड) ठरावीक मुदतीनंतर अणुचाचण्या
ए) ब आणि क    बी) अ आणि ब    सी) अ आणि ब    डी) अ आणि ड
उत्तरे : १) ए, २) बी, ३) सी, ४) डी, ५)ए, ६) बी, ७) सी, ८) डी, ९) ए, १०) डी, ११) ए, १२) बी, १३) सी, १४) डी, १५) ए, १६)  बी,  १७) सी, १८) डी,  १९) ए, २०) बी