संख्या :
मूळसंख्या – फक्त त्याच संख्येने किंवा १ ने पूर्णभाग जाणारी संख्या
समसंख्या – २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या, विषमसंख्या – २ ने भाग न जाणारी संख्या
जोडमूळ संख्या – ज्या दोन मूळ संख्यांत केवळ २ चा फरक असतो
संयुक्तसंख्या – मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिक संख्या
kg01– एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०, तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
– ० ते १०० पर्यंतच्या संख्यांत- ।) २ पासून ९ पर्यंतचे अंक प्रत्येकी  २० वेळा येतात. ।।) १ हा अंक २१ वेळा येतो. ।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.
– १ ते १०० पर्यंतच्या संख्यात- ।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी १९ येतात. ।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्या प्रत्येकी  १८ संख्या असतात.
– दोन अंकांमधून एकूण २ संख्या, तीन अंकांमधून एकूण ६ संख्या, चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.
लसावि – लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या: दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या
मसावि – महत्तम सामाईक विभाजक संख्या: दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या

संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम –
समसंख्या + समसंख्या= समसंख्या. समसंख्या – समसंख्या= समसंख्या.
विषम संख्या – विषमसंख्या = समसंख्या. विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
समसंख्या (गुणिले) समसंख्या = समसंख्या. समसंख्या (गुणिले) विषम संख्या = समसंख्या.
विषमसंख्या (गुणिले)  विषमसंख्या= विषमसंख्या.

According to the United Nations Population Fund UNFPA report the estimated population of India is 144 crores
भारताची लोकसंख्या १४४ कोटी, माता मृत्युदरात घट
Will climate change be key issue in this years election What do youth think
विश्लेषण : यंदाच्या निवडणुकीत हवामान बदल हा कळीचा मुद्दा ठरेल का? तरुणाईला काय वाटते?
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ

सरासरी:
१) ल्ल संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीज (भागिले) ल्ल
२) क्रमश: संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
३) संख्यामान दिल्यावर ठरावीक संख्यांची सरासरी (ल्ल) (पहिली संख्या+ शेवटची संख्या) (भागिले) ल्ल
४) ल्ल या क्रमश: संख्याची बेरीज = (पहिली संख्या+ शेवटची संख्या) (गुणिले) ल्ल (भागिले) २

सरळव्याज
(क) ढ (गुणिले) फ (गुणिले) ठ (भागिले) १००
मुद्दल  (पी)= आय गुणिले १०० भागिले आर गुणिले एन
व्याजदर (आर)= आय गुणिले  १०० भागिले पी गुणिले एन
मुदत वर्षे (एन)= आय गुणिले १०० भागिले पी गुणिले आर

नफा-तोटा
नफा = विक्री- खरेदी, विक्री = खरेदी + नफा, खरेदी = विक्री+ तोटा, तोटा = खरेदी – विक्री
शेकडा नफा= प्रत्यक्ष नफा गुणिले १०० भागिले  खरेदी
शेकडा तोटा = प्रत्यक्ष तोटा गुणिले १०० भागिले खरेदी
विक्रीची  किंमत = खरेदीची  किंमत गुणिले (१००+ शेकडा नफा) भागिले १००
खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत गुणिले १००) भागिले (१००+ शेकडा नफा)

प्रमाण  भागीदारी
नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर (गुणिले) मुदतीचे गुणोत्तर, भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+ मुदतीचे गुणोत्तर, मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर (भागिले) भांडवलाचे गुणोत्तर.
वेग-वेळ-अंतर:
ए) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी (भागिले) ताशी वेग (गुणिले) १८/५
बी) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पुलाची लांबी (भागिले) ताशी वेग (गुणिले) १८/५
सी) गाडीचा ताशी वेग= कापावयाचे एकूण अंतर (भागिले) लागणारा वेळ (गुणिले) १८/५
डी) गाडीची लांबी= ताशी वेग गुणिले खांब ओलांडताना लागणारा वेळ (गुणिले) ५/१८
ई) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग (गुणिले) पूल ओलांडताना लागणारा वेळ + ५/१८
एफ) गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ काढताना १८/५ ने गुणा व अंतर काढताना ५/१८ ने गुणा
जी) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग= नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग – प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग भागिले २

विभाज्यतेच्या कसोटय़ा
२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या – संख्येच्या एकक स्थानी ०, २,  ४, ६, ८ यापैकी कोणताही अंक असल्यास.
३ ची कसोटी- संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेष भाग जात असल्यास.
४ ची कसोटी- संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यास अथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्य असल्यास.
५ ची कसोटी- संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५ असल्यास.
६ ची कसोटी- ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भाग जातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोच किंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.
७ ची कसोटी- संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्या संख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.
८ ची कसोटी- संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेष भाग जात असल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३ शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंक असतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.
९ ची कसोटी- संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला ९ ने निशेष भाग जातो.
११ ची कसोटी- ज्या संख्येच्या विषम स्थानच्या या समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११ च्या पटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भाग जातो. एक सोडून १ अंकाची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या  पटीत असतो.
१२ ची कसोटी- ज्या संख्येला ३ व ४ या अंकांनी नि:शेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
१५ ची कसोटी- ज्या संख्येला ३ व ५ अंकानी नि:शेष भाग जातो त्या संख्येला १५ ने भाग जातो.
३६ ची कसोटी- ज्या संख्येला ९ व ४ ने नि:शेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग  जातो.
७२ ची कसोटी- ज्या संख्येला  ९ व ८ ने नि:शेष भाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.
प्रा. सचिन परशुराम आहेर
सेवासदन अध्यापिका
विद्यालय, पुणे-३०