१) खालीलपैकी कोणत्या उपकरणात कायम चुंबक वापरला जात नाही?
ए) विद्युतघंटा, बी) विद्युत मोटार, सी) विद्युतजनित्र, डी) विद्युत प्रवाहदर्शक
kg01२) प्रकाश किरणास हवेतून आणि काचेतून प्रवास करण्यास समान वेळ लागतो. जर काचेतून प्रवास केलेले अंतर ५ सें.मी. आहे आणि जर काचेच्या वक्रीभवनांक १.५ असेल, तर प्रकाशाने हवेत आक्रमिलेले अंतर … सें.मी. असेल.
ए) ६, बी) ७.५, सी) ५, डी) ८
३) आपणाला धुक्यातून दिसत नाही; कारण ..
ए) धुक्याच्या कणांमुळे प्रकाश परावर्तित होतो. बी) धुक्याचा वक्रीभवनांक खूप जास्त आहे. सी) धुक्याच्या कणांमुळे प्रकाशाचे वितरण होते. डी) धुके प्रकाश शोषून घेते.
४) चंद्रावरून पाहिल्यास आकाश काळे दिसते; कारण ..
ए) चंद्र हा न चमकणारा ग्रहगोल आहे. बी) चंद्रावर पडणारा सर्वसूर्यप्रकाश तो शोषून घेतो. सी) चंद्रावर सूर्यप्रकाश पोहोचत नाही. डी) चंद्रावर वातावरण नाही.
५) पट्टीचुंबकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलांच्या रेषांच्या संदर्भात खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
ए) त्या चुंबकाच्या बाहेरून आणि आतून उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे जातात. बी) त्या काल्पनिक रेषा आहेत. सी) त्या बंदिस्त आणि सतत वक्र असतात. डी) त्या एकक उत्तर ध्रुवाच्या हालचालीच्या मार्गाचे प्रतिनिधित्व करतात.
६) दोन पोकळ अर्धगोल ऑटो व्हॅन गेरिक प्रयोगात सहजपणे वेगळे होऊ शकत नाही; कारण ..
ए) आतील दाब बाहेरील दाबापेक्षा जास्त आहे.
बी) बाहेरील दाब आतील दाबापेक्षा जास्त आहे.
सी) दोन अर्धगोल एकमेकांत विलीन होऊन एक गोल तयार होतो.
डी) आतील व बाहेरील दाब समान आहे.
७) जेव्हा फटाका फुटतो, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतरण होते?
ए) प्रकाश ऊर्जेचे रासायनिक, उष्णता व ध्वनी ऊर्जेत रूपांतरण. बी) रासायनिक ऊर्जेचे ध्वनी व उष्णता ऊर्जेत रूपांतरण. सी) रासायनिक ऊर्जेचे प्रकाश व ध्वनी ऊर्जेत रूपांतरण. डी) रासायनिक ऊर्जेचे ध्वनी, प्रकाश व उष्णता ऊर्जेत रुपांतरण.
८) सोमवारी चंद्रोदय संध्याकाळी ७ वाजून ३५ मि. वाजता झाला त्याच आठवडय़ातील बुधवारी चंद्रोदय किती वाजता होईल?
ए) ९ वाजून १५ मिनिटांनी,
बी) ५ वाजून ५५ मिनिटांनी,
सी) ६ वाजून ४५ मिनिटांनी,
डी) त्याच वेळेस.
९) खालीलपैकी कोणता ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे भ्रमण करतो?
ए) पृथ्वी, बी) गुरू, सी) शुक्र, डी) बुध
१०) जर सपाट आरसा व आपाती किरण यामध्ये ३० अंशाचा कोन होत असेल, तर परावर्तित कोन किती मापाचा होईल?
ए) शून्य अंश, बी) ९० अंश, सी) ३० अंश, डी) ६० अंश
११) टोमॅटोमध्ये पुढीलपैकी कोणते आम्ल आहे?
ए) सायट्रिक आम्ल, बी) ऑक्झॉलिक आम्ल, सी) लॅक्टिक आम्ल, डी) टार्टारिक आम्ल
१२) काचेला काळा रंग … या संयुगामुळे येतो.
ए) ठड्र, बी) टल्लड2, सी) उ४2ड, डी) उंड
१३) वेगळा घटक ओळखा
ए) लोखंड, बी) हिरा, सी) मॅग्नेशियम, डी) सोडियम
१४) केंद्राभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या भ्रमणासाठी … बल आवश्यक आहे.
ए) विद्युत, बी) गुरुत्वीय, सी) प्रोटॉन इलेक्ट्रॉनमधील आकर्षण, डी) चुंबकीय
१५) सूर्यप्रकाशामुळे ओझोनचे … होऊन ऑक्सिजन तयार होतो.
ए) क्षपण, बी) क्षरण, सी) ऑक्सिडेशन, डी) संश्लेषण
१६) २२ कॅरट सोने तयार करण्यासाठी … भाग सोने आणि … भाग तांबे वापरतात.
ए) २४.२, बी) २२.२, सी) २३.१, डी) ९९. १
१७) ज्या द्रावणामध्ये लाल लिटमस निळा होतो, त्या द्रावणाचा स्र्ऌ … असेल.
ए) ४, बी) ७, सी) १०, डी) १
१८) सीएनजी संबंधीचे चुकीचे विधान खालीलपैकी कोणते?
ए) तो काजळी निर्माण करीत नाही.
बी) उच्च दाबाखाली त्याचे सहजपणे द्रवीभवन होते.
सी) एल.पी.जी.च्या तुलनेत तो कमी प्रदूषके निर्माण करतो.
डी) तो हरितगृहवायू निर्माण करीत नाही.
१९) खालीलपैकी कोणता दुवा अवयव व मेंदूला जोडतो?
ए) चेतापेशी, बी) सहयोगी केंद्रे, सी) प्रतिक्षिप्त क्रिया, डी) मज्जारज्जू
२०) लहान आतडय़ातील आतील पृष्ठभाग गुळगुळीत झाला तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य असेल?
ए) माणूस जगू शकणार नाही; कारण पचनक्रियेचा मार्ग हानीसाठी प्रभावीत असेल.
बी) माणसाच्या आतडय़ाची लांबी बरीच जास्त असावी लागेल, म्हणजे पचलेले अन्न योग्य प्रमाणात शोषून घेता येईल.
सी) पचनाची क्रिया योग्य होणार नाही; कारण ट्रिपसिन स्रावणाऱ्या पेशींची संख्या कमी असेल.
डी) अन्नशोषणाचा वेग जास्त होईल; कारण अन्नवहन सहज होईल.
२१) डॉक्टर कावीळ झालेल्या व्यक्तीस तेलकट पदार्थ खाण्यास बंदी घालतात  कारण..
ए) स्निग्ध (तेलकट) पदार्थ पचण्यास जड असल्याने
बी) काविळीमध्ये स्निग्ध पदार्थाचे पचन करणारी विकरे तयार होत नसल्याने.
सी) यकृताचे कार्य बिघडल्यामुळे.
डी) स्वादुपिंडात संसर्ग झाल्यामुळे.
२२) अतिशय स्थूल व्यक्तीचे वजन कमी करण्यासाठी जठराचा काही भाग बांधून ठेवला जातो. त्यामुळे … कमी होते.
ए) अन्नाचे पचन, बी) विकरांचा स्राव, सी) जठराची अन्न साठवण्याची क्षमता, डी) अन्नग्रहण.
२३) अधिशयन काळ म्हणजे … लागणारा काळ
ए) जंतूसंसर्गानंतर रोगाची लक्षणे दिसेपर्यंत.
बी) अंडय़ातून पिल्लू बाहेर येण्यासाठी.
सी) संसर्ग झाल्यापासून रोग बरा होईपर्यंत.
डी) विषाणू व जीवाणू यांच्याकडून विषारी पदार्थ स्रवण्यासाठी
२४) गटात न बसणारा पर्याय ओळखा
ए) मृगल, बोई, कार्प; बी) बोई, मुडुशी, रेणवी; सी) रेनवी, खासी, रोहू; डी) कटला, रोहू, रेनवी.
२५) ताप येण्याचे कारण..
ए) शारीरिक अभिक्रिया, बी) जीवाणू किंवा विषाणू, सी) रोगजंतू नष्ट करण्यासाठी उष्णता निर्माण करून शरीराने दिलेला प्रतिसाद, डी) सर्व रोग

उत्तरे
१) ए, २) बी, ३) सी, ४) डी, ५) ए, ६) बी, ७) डी, ८) ए, ९) सी, १०) डी, ११) बी, १२) ए, १३) बी, १४) सी, १५) ए, १६) बी, १७) सी, १८) डी, १९) ए, २०) बी, २१) सी, २२) डी, २३) ए, २४) बी, २५) सी