*ध्येय निश्चित करणे : सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी ध्येय निश्चित करा. हे एकदा ठरविले की, त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, त्याची माहिती चांगल्या प्रकारे करून घेणे गरजेचे असते.
*कष्टाची तयारी असावी : कोणत्याही परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी कष्ट हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आज अनेकांना अभ्यास म्हटला की कंटाळा येतो. वाचन-लेखन म्हटले की kg01विद्यार्थ्यांना नको असते. यश मिळवायचे असेल तर कष्टाला अजिबात घाबरण्याचे कारण नाही. अभ्यासाने, वाचनाने मनुष्य समृद्ध होतो, संपन्न होतो, श्रीमंत होतो, हे विसरता कामा नये. उज्ज्वल भविष्यासाठी थोडे कष्ट घ्यावेच लागतात.

*अभ्यासातील अडथळे दूर करणे : कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यात अडथळे हे असणारच. म्हणून ती गोष्ट करायचीच नाही का? अभ्यास साहित्य, अभ्यासाचे ठिकाण, अभ्यासात लक्ष न लागणे, एखादा विषय अवघड वाटणे, पाठांतर करण्याचा कंटाळा असे अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. म्हणून अशा अडथळ्यांवर यशस्वीपणे मात करणे गरजेचे आहे, तरच चांगल्या प्रकारे आपल्याला यश मिळविता येईल.
*अभ्यासाची चांगली सवय लागते : शोध घेण्याच्या कौशल्यतंत्राने आपला विकास होतो. मनातील भीती या प्रकारच्या अभ्यासाने दूर होते. आत्मविश्वास वाढतो. बारीक अभ्यास करण्याची सवय लागते. स्वत:चे अभ्यास साहित्य विकसित करता येते. तयार अभ्यास साहित्यावर अवलंबून न राहता स्वत:चे तयार केलेले साहित्य विश्वासार्ह असे होते. प्रश्न कोणत्याही पद्धतीने विचारला तरी योग्य उत्तर देता येते. थोडक्यात, अभ्यासाच्या या चांगल्या सवयीमुळे परीक्षेला लागणाऱ्या सर्व गुणांची तयारी होते.
*इतर महत्त्वाच्या गोष्टी : कोणत्याही परीक्षेत पहिल्या प्रयत्नात चांगले यश मिळविता येते. त्यात अवघड असे काहीच नाही. त्यासाठी अभ्यासातील सातत्य, अभ्यासक्रम माहिती करून घेणे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून घेणे, परीक्षेतील सर्व टप्प्यांची चांगल्या प्रकारे माहिती असणे, अभ्यास साहित्यातील विविधता, स्वत: काही प्रश्न तयार करणे या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कोणतीही परीक्षा अवघड नाही हे एकदा लक्षात घेतले की पहिल्या प्रयत्नात चांगल्या प्रकारचे यश मिळविता येते, हे विसरू नका.
परीक्षेच्या तोंडावर : परीक्षा अगदी जवळ आलेली असताना झालेले विषय पक्के करा. अभ्यासात सातत्य आवश्यकच आहे. मात्र झालेला अभ्यास आणि नवी माहिती यांमुळे गोंधळ उडणार नाही याची काळजी घ्या. परीक्षेच्या आदल्या दिवशी विषयाचे महत्त्वाचे मुद्दे चाळा. आदल्या दिवशी नव्याने कोणतेही पाठांतर करू नका. कोणत्याही परीक्षेसाठी, यशस्वी होण्यासाठी चांगल्या वाटचालीसाठी सकारात्मक असणे आवश्यक असते. खरे तर कोणतीही गोष्ट अवघड नसते हे लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीची, एखाद्या विषयाची किंवा परीक्षेची उगाचच आपण भीती घेतलेली असते किंवा मनात तशा प्रकारची परिस्थिती कोणी तरी निर्माण केलेली असते. त्यामुळे आपली मानसिकताही तशी तयार करून घेतो, हे नेहमी लक्षात ठेवा. अशक्य, अवघड काहीच नाही, हे मनाशी पक्के ठरवा.
ताणाचे नियोजन : परीक्षा जवळ आली की हळूहळू छातीत धडधडायला लागते. परीक्षेचा नकळतपणे आपल्यावर ताण येत असतो. मात्र हाच ताण परीक्षेसाठी सर्वात घातक गोष्ट आहे. ताण येऊ नये यासाठी स्वत:वर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या आधीपासूनच शांत राहा. वातावरण चांगले ठेवा, वाद, भांडणे टाळा. लक्ष पूर्णपणे अभ्यास आणि तयारीवर केंद्रित करा. परीक्षेच्या दिवशीही ताण येऊ नये, यासाठी आधीपासूनच तयारी ठेवा. परीक्षेसाठी लागणारे साहित्य नीट ठेवा, वेळेचे नियोजन काटेकोरपणे करा, म्हणजे ताणाला दूर ठेवता येईल. काही वेळा आदल्या दिवशी उजळणी करताना, आपल्याला काहीच आठवत नाही असे वाटते आणि आपण घाबरून जातो. मात्र स्वत:वर विश्वास ठेवा. अशा प्रकारे ताण आला तर पुस्तक बाजूला ठेवून थोडे फिरून या किंवा दुसऱ्या एखाद्या कामात लक्ष द्या.

BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
S Somnath
चांद्रयान ४ मोहिमेबाबत इस्रोच्या प्रमुखांकडून मोठी अपडेट; म्हणाले “पुढील टप्पा…”
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

हे लक्षात घ्या
*परीक्षेचे स्वरूप सोपे असते, त्यामुळे परीक्षेची भीती बाळगू नये.
*परीक्षेसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे.
*वेळ मिळेल तेव्हा सतत अभ्यास व वस्तुनिष्ठ वाचन करावे.
*पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होणारे असंख्य विद्यार्थी आहेत.
*परीक्षा अवघड आहे, असा उगाचच बाऊ केलेला आहे.
*रोज एक तरी वर्तमानपत्र वाचा.
*पहिल्या प्रयत्नात अपयश आले तर परीक्षा देण्याचा नाद सोडू नका. तुम्ही परीक्षा पास होणार आहात. फक्त कष्ट घेण्याची ऊर्मी, आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.