आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

भररस्त्यात जगाला विसरून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची एकतानता पाणीपुरीच शिकवते. हिच्या सान्निध्यात कॅलरीजच्या गणितांचा विसर पडतो.

sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
worlds clearest water
काचेसारखे पारदर्शक ‘या’ तलावाचे पाणी; पण स्पर्शालाही बंदी! कारण काय…?
pimpri chinchwad, citizen, water scarcity, Pavana Dam, Water Storage, Decrease, Summer Heat Rises, Evaporation, marathi news,
पिंपरी-चिंचवडवर पाणीटंचाईचे संकट?… पवना धरणातील पाणीसाठ्यात घट
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

झणझणीत, तिखट, क्रिस्पी, कुरकुरीत, गोड, आंबट, ठसकेबाज, स्फोटक आणि बरंच काही. ही विशेषणं लागू व्हावी असा एकच पदार्थ आपल्या नजरेसमोर येतो. तो म्हणजे पाणीपुरी. समस्त भारतीयांच्या जिव्हांना जोडणारी चव म्हणजे पाणीपुरीची. त्यातही गंमत अशी की, भारताच्या कानाकोपऱ्यात पाणीपुरी आहे. तिची नावं भिन्न, बनवण्याची पद्धत वेगळी आहे तरी संपूर्ण भारतभरात अतिशय चवीने, आवडीने हा पदार्थ खाल्ला जातो. काही पदार्थ घरीच खावे या वर्गातले असतात, तसे काही पदार्थ बाहेरच खावेत आणि या वर्गात पाणीपुरी मोडते. म्हणजे घरी आईने कितीही स्वच्छ आणि चटपटीत पाणीपुरी केली तरी रस्त्यावरच्या भय्याकडची पाणीपुरीच आपल्याला जास्त आठवत राहते. अनेकांच्या मते तर स्वच्छतेचे प्रमाण जितकं व्यस्त तितकी पाणीपुरी चटकदार.

गंमत म्हणजे भारतातील या सुपरडुपर हिट पदार्थाची निर्मिती आपणच केली असा दावा करायला चक्क आतापर्यंत कुणीही सरसावलेलं नाही. बाकीच्या पदार्थाविषयी हिरिरीने निर्मितीचा दावा करणारे पाणीपुरीच्या बाबतीत गप्प का? हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. पण तरी सामान्यपणे दक्षिण बिहारमध्ये, मगध प्रांतात पाणीपुरीचा शोध लागला असावा असा अंदाज आहे. म्हणजे याबाबतीत पाणीपुरी ‘यूपी’वाली ठरते. पण मोगल काळातील राजेरजवाडे, सरदार यांना तिखट, झणझणीत खाण्याचा असलेला शौक पाहता अगदी आताच्या रूपात नाही पण वेगळ्या रूपात पाणीपुरी अस्तित्वात असावी असा काहीसा अंदाज आहे. तरीही अमुक एका बेगमेला किंवा राजाला पाणीपुरी फार म्हणजे फार आवडायची बुवा! असा उल्लेख कुठेही आढळत नाही. बरं या पाणीपुरीतील पुरीचा कडक स्वभाव बघता ती घरी खाण्यासाठी तयार झाली असावी असेही वाटत नाही. बाहेर एखादा पदार्थ खाण्यासाठी तो हातात नीट धरता यावा या हेतूने कडक पुरी आणि आतला मालमसाला यांचा विचारपूर्वक वापर एखाद्या फेरीवाल्या किंवा चाटवाल्या विक्रेत्याकडूनच झालेला असण्याची शक्यता जास्त आहे. तोच तिचा जनक असावा किंवा चाटमध्ये उरलेले पदार्थ टाकण्याऐवजी प्रयोग करता करता पाणीपुरी त्याला गवसली असावी.

आजही पाणीपुरीच्या स्वरूपावर इतके भिन्न भिन्न प्रयोग होताना दिसतात, अशाच प्रयोगातून पाणीपुरी तिच्या सध्याच्या रूपापर्यंत पोहोचली असावी. एकूणच तिच्या निर्मितीबद्दल विशिष्ट अशा कारणाची मीमांसा करता येत नाही. यावर अनेक जणांचे मत असेच आढळेल की, पाणीपुरी कुठे जन्माला आली याने काही फरक पडत नाही; आम्हाला खाण्याशी मतलब आहे.

भारताच्या विविध प्रांतांत पाणीपुरीचे नाममाहात्म्य विलक्षण आहे. कुठे ती पुचका आहे, कुठे फुलकी, कुठे पानी के बताशे म्हणून लोकांना ती रिझवते तर कुठे गोलगप्पा म्हणून. गुजरातच्या काही भागात ती पकोडी (पकोडा नव्हे) आहे तर काही अन्य ठिकाणी गपचप. पश्चिम बंगाल या पुचक्यांसाठी खास ओळखला जातो. त्यातही कोलकत्यातील दही पुचके एकदम लाजवाब. हिची नावे अनेक. काम मात्र एक, आपल्या जिव्हांना चवीच्या साथीने रिझवत राहणे. भारतातले काही प्रांत या पाणीपुरीची इतकी कोडकौतुकं करतात की काही ठिकाणी पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या आंबट-गोड-तिखट पाण्याचीही ५-६ प्रकारात विविधता आढळते. म्हणजे तुम्ही पाणीपुरी खायला उभे राहिलात की प्रत्येक वेळी ती गोल गरगरीत कडक पुरी आतल्या मालमसाल्यासह वेगवेगळ्या पाण्यात डुबकी मारून तुमच्या पुढय़ात हजर. प्रत्येक पुरीचा स्वाद निराळा. तसं पाहायला गेलं तरी पाणीपुरी खाणं हे आपल्याकडे फार सहज पाहिलं जातं. संध्याकाळी बाहेर पडलो की, एक डिश तो बनती है, म्हणत अगदी रोज किंवा दिवसाआड पाणीपुरी खाणारे चाहते तुम्हाला अनेक भेटतील. पैजेसाठी तर पाणीपुरी बेस्टच. एक तर फार खर्च न करता ही पैज लावता येते आणि पाणीपुरी हे अनेकांचं प्रेमाचं खाणं असल्याने खाल्ल्या ३०- ४० पुऱ्या असं सहज म्हणता येतं. तरीही पाणीपुरी खाणं ही एक साधना आहे. एक तर पाणीपुरीवाल्याकडच्या गर्दीतून वाट काढत स्वत:ची वाटी किंवा डिश घेऊन नेमकी जागा हेरता आली पाहिजे. त्यानंतर आपण एक-दोन जणंच असू तर पाणीपुरीवाल्या भय्याच्या वेगाशी स्पर्धा करत तोंडातली पुरी संपवत नव्या पुरीला ये म्हणायची कला अवगत करावी लागते. बरेच जण असतील तर इतरांच्या हलत्या तोंडाकडे पाहात, मेरा नंबर कब आयेगा, हा पेशन्स दाखवावा लागतो. पाणीपुरी ही सगळ्यांना समान पातळीवर यायला लावणारी रुलब्रेकर आहे.

साधारणपणे पदार्थ कसा खावा याचे नियम ही पाणीपुरी धुडकावून लावते. ती नाजूक ओठांच्या हालचालींना गुंडाळून ‘आ’ वासायला लावते. तोंडात पुरी भरून खायला शिकवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सान – थोर कुणी असा, तुम्हाला रस्त्यावर हातात डिश घेऊन उभं राहायचा नम्रपणा शिकवते. याबाबतीत पाणीपुरीला बंडखोरच म्हटले पाहिजे. रूढ पद्धतींविरुद्ध ती अनेक गोष्टी करायला लावते.

एकाच वेळी रडतारडता हसवणारी पाणीपुरी हजारो दिलोंकी धडकन उगीच झालेली नाही. म्हणूनच जिला रोज भेटावंसं वाटावं, जिच्या सान्निध्यात बिनधास्त हसता-रडता यावं आणि जिच्या अस्तित्वाची जाणीव तिला सोडून गेल्यावरही जाणवत राहावी अशी जिवाभावाची घट्ट मैत्रीण आणि पाणीपुरी यात फारसा फरक नाही.