सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याबद्दल येथील एकास १० वष्रे सक्तमजुरी व तेरा हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी सुनावली. बबलू शौकत कलाल (वय ३६, रा. कराड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
मुळचा कराडचा असलेला बबलू कलाल हा हातकणंगले येथील मटन शॉपमध्ये कामाला होता. बबलू याने २३ डिसेंबर २०१२ ते २१ फेब्रुवारी २०१३ च्या दरम्यान सहा वर्षीय मुलीवर अनसíगक कृत्य करून बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने कराड पोलीस स्टेशनमध्ये २२ फेब्रुवारी २०१३ रोजी तक्रार दिली होती. परंतु ही घटना हातकणंगले येथे घडल्याने गुन्हा हातकणंगले पोलिसांकडे वर्ग केला.
इचलकरंजी येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर लहान मुलीवरील लंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे जादा दोषारोप ठेवण्यात आले. सरकारतर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पंच व दुकानाचे शेजारी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव, सहा. फौजदार एस. डी. कोळी व तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक ए. एन. संकपाळ यांच्या साक्षी घेण्यात आल्या. तर बचाव पक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. निकाल देताना सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून, आरोपीला दोषी धरून व लहान मुलीवरील लंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे ७ वष्रे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड आणि कलम ६ प्रमाणे १० वष्रे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड तर कलम ८ प्रमाणे ५ वष्रे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड तसेच कलम १० प्रमाणे ७ वष्रे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही शिक्षा एकाच वेळी भोगण्याची तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीस देण्याचा आदेश दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 2:02 am