News Flash

१०५ वर्षांची वृद्धा करोनामुक्त

मांगुर या गावी राहणाऱ्या कमलादेवी अप्पासाहेब माने असे या आजीबाईंचे नाव आहे.

कोल्हापूर : येथील एका रुग्णालयात करोना उपचार घेत असलेल्या १०५ वर्षांच्या आजीबाईंनी आजारावर मात केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी फुलांचा वर्षांव करीत त्यांचे स्वागत केले. निवृत्त पोलीस उप अधीक्षक मोहनराव माने यांच्या त्या आई तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या त्या सासू आहेत.

मांगुर या गावी राहणाऱ्या कमलादेवी अप्पासाहेब माने असे या आजीबाईंचे नाव आहे. त्या भीम बहादुर सरकार घराण्यातील आहेत. पंधरवडय़ापूर्वी त्यांना करोनाची लक्षणे दिसल्यावर चाचणी केली असता ती सकारात्मक आली. येथील अपेक्स हॉस्पिटल मध्ये डॉ. निरंजन राठोड, डॉ. सुशांत गुणे यांनी त्यांच्यावर उपचार केले. दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याने त्यांनी करोनावर मात केली.

आज त्यांच्या कुटुंबीयांनी फुलांचा वर्षांव करीत स्वागत केले. शंभरी ओलांडली असली तरी त्यांची प्रकृती नेटकी असते. व्यायाम, वृत्तपत्र वाचन, दैनंदिन कामे त्या करीत असतात, असे त्यांचे नातू पंचायत समिती सदस्य वीरेंद्र माने यांनी सांगितले. या वेळी माधवी माने, जयेश ओसवाल उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 2:18 am

Web Title: 105 year old woman recovered from corona coronavirus zws 70
Next Stories
1 महापुरावर अद्याप काथ्याकूटच
2 आगामी हंगामातही साखर उद्योगासमोर अतिरिक्त साठ्याची चिंता
3 कोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करणार
Just Now!
X