07 July 2020

News Flash

कोल्हापूरमध्ये १४ नवे बाधित; एकूण रुग्ण ३९७

सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यात

संग्रहित छायाचित्र

करोनाबाधित रुग्णांबाबत काल कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळाला असताना आज जिल्ह्यामध्ये १४ सकारात्मक रुग्ण आढळले. यामुळे करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९७ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनारुग्णांची संख्या वाढत असताना काल प्राप्त झालेले सर्व अहवाल नकारात्मक होते. त्यामुळे जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. त्यामध्ये आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार १४ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आहेत. यामुळे  जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३९७ झालेली आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यात आढळणे पाटणे गावात ३, जाम्भूर येथे दोन, थावडे येथे १, शित्तुर वरुण येथे १ रुग्ण आढळला तर भुदरगड तालुक्यातील किरवडे गावातील एक रुग्ण सकारात्मक आढळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 3:08 am

Web Title: 14 new affected in kolhapur abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोल्हापुरात पुराला तोंड देण्याबाबत मूलभूत उपाययोजनांकडे दुर्लक्ष
2 कोल्हापूरसाठी दिलासा!
3 कोल्हापूरमध्ये परप्रांतीयांचा गावचा ओघ थंडावला
Just Now!
X