News Flash

कोल्हापूर जिल्ह्यातीलआरोग्य उपकेंद्रांसाठी 18 कोटीचा निधी मंजूर – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

करोना संसर्गाचा मागील दीड वर्षाच्या कार्यकाळात आरोग्य विभागातील सर्व घटकांनी जबाबदारीने काम केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कोल्हापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतंर्गत जिल्ह्यातील 363 आरोग्य उपकेंद्रांसाठी जवळपास 17 कोटी 94 लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी दिली.

आयुष्यमान भारत योजनेतंर्गत आरोग्य सेवेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी या उपकेंद्रांची डागडूजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटी सही मजबूत करणे यासाठी हा निधी प्राप्त झाला असल्याचे यड्रावकर यांनी सांगितले.

करोना संसर्गाचा मागील दीड वर्षाच्या कार्यकाळात आरोग्य विभागातील सर्व घटकांनी जबाबदारीने काम केले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे यांनी सक्षमपणे आपली भूमिका आणि जबाबदारी सांभाळली होती आणि ती आजही सांभाळत आहेत. या उपकेंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याबरोबरच आरोग्याबाबतच्या सर्वेक्षणाचे कामसुध्दा जबाबदारीने पार पाडले गेले आहे. एकुणच आरोग्य उपकेंद्रे यांची गरज करोना महामारीच्या काळात प्रभावीपणे जाणवली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणखीन मजबूत करणे गरजेचे आहे, असेही  यड्रावकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 11:59 pm

Web Title: 18 crore sanctioned for health sub centers in kolhapur district akp 94
Next Stories
1 कोल्हापुरात गारांचा जोरदार पाऊस
2 राज्यातील बांधकाम मजुरांच्या खात्यात १३७ कोटींचा निधी जमा
3 ‘गोकुळ’चा सत्तासंघर्ष आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये!
Just Now!
X