यंदाच्या ऊ स गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीसह प्रतिटन २०० रुपयांची पहिली उचल द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी केली.

शेतकरी संघटनेची १८वी ऊ स परिषद जयसिंगपूर येथे पार पडली. या वेळी शेट्टी यांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे अशी मागणी केली. शेट्टी यांनी सांगितले,की महापुरात बुडालेल्या उसाची कोणतीही कपात न करता प्राधान्याने तोड देण्यात यावी. ज्या साखर कारखान्यांनी अद्याप गेल्या हंगामाची  एफआरपी दिलेली नाही त्या कारखान्याच्या संचालकावर फौजदारी गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हावी. महापुरातील शेतकऱ्यांचे ज्या पद्धतीने कर्ज माफ करण्यात आले आहे, त्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यात यावीत.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा विनाअट  झाला पहिजे. मायक्रो फायनान्स मध्ये अडकलेल्या महिलांची थकीत कर्ज त्वरित माफ करण्यात यावीत, कृषी वीज बिल माफ करून १२ तास वीज देण्यात यावी असेही ते म्हणाले.

चळवळ टिकली पाहिजे

शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊ स दरावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. जयसिंगपूर येथे  राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले होते. कार्यकर्त्यांंनी ‘चळवळ टिकली पाहिजे’ अशा आशयाच्या टोप्या घातल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ नही परिषदेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांंत उत्साह होता. शेट्टी येण्याच्या मार्गावर  फु लांचा गालिचा टाकला होता. आमदार भोयर, प्रा. जालंदर पाटील, प्रकाश पोपळे, सावकार मदनाईक, राजेंद्र गड्डय़ानावर यावेळी उपस्थित होते.