कोल्हापूर विमानतळाच्या विकास आराखडय़ासाठी राज्य सरकार २० टक्के हिस्सा म्हणून ५५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा बुधवारी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मुंबईत केली. खासदार धनंजय महाडिक यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विमानसेवेतील मुख्य अडचण मांडल्यानंतर त्यांनी हा तातडीने निर्णय घेतल्याने कोल्हापूर-मुंबई विमानसेवा उड्डाण भरण्याच्या मार्गावर आली आहे.

कोल्हापूरची विमान सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी खासदार महाडिक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मंगळवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बठकीत राज्य शासन, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, हवाई वाहतूक मंत्रालय यांचे प्रतिनिधी तसेच खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, आमदार सतेज पाटील यांनी विमानसेवेचा आढावा घेतला. महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी २७४ कोटी रुपये खर्चाच्या विमानतळ विकास आराखडय़ाला मंजुरी दिली. मात्र महाराष्ट्र शासनाने ८० कोटी रुपये खर्च करावेत, अशी अट घातली.  त्यामुळे महाडिक यांनी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, हिंदुराव शेळके यांच्यासमवेत, मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
airport funnel zone
आमचा प्रश्न – वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ: विमानतळालगतच्या ‘फनेल झोन’चा प्रश्न धसास कधी?
Sale of Sangli Airport land during Uddhav Thackeray was cm says Industries Minister Uday Samant
सांगली विमानतळाच्या जागेची विक्री ठाकरे सरकारच्या काळात – उद्योगमंत्री उदय सामंत
Jalgaon, Gold, Rs 20 Lakh, Seized, Suspicious Car, Election Security Check,
जळगाव जिल्ह्यात नाकाबंदीत काय सापडले पहा…

 

सायिझग व्यवसाय सुविधा इमारतीचे आज उद्घाटन

कोल्हापूर : सायिझग व्यवसायात ३६ वष्रे कार्यरत असलेल्या असोसिएशनने सायिझग व्यवसायासाठी सुविधा देण्याच्या उद्देशाने इमारत उभारली आहे. या इमारतीचे उद्घाटन गुरुवार, २० ऑक्टोबर रोजी वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होत असल्याची माहिती असोसिएशनचे उपाध्यक्ष वसंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. २७० सभासदांच्या वर्गणीतून सुमारे २ कोटी रुपयांची इमारत आता गणेशनगरमध्ये साकारली असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी सुरेश मांगलेकर, प्रमोद म्हेतर, प्रसाद चांदेकर, दिलीप ढोकळे आदी उपस्थित होते.