महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त व्यावसायिकांसाठी मदत म्हणून शासनाने ६० कोटी रुपये बँकेत जमा केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले,की छोटे गॅरेज, दुकानदार, टपरी धारक, हातगाडी धारक अशा १५ हजार ५२९ पूरग्रस्त व्यावसायिक लाभार्थींसाठी ६० कोटी ७२ लाख ७५ हजार ९८रुपये इतकी रक्कम तहसील कार्यालयाकडून बँकेत जमा केलेली आहे.

यापकी १२ हजार  १७९ लाभार्थींच्या खात्यावर ५० कोटी ६३ लाख ६९ हजार ३९२रुपये इतकी रक्कम ३१ ऑक्टोबर अखेर बँकेकडून लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थींच्या खात्यावर त्वरित जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पूरबाधित ८८ हजार ६०० कुटुंबापकी ८५ हजार ८०८ कुटुंबाना ४२ कोटी ९० लाख ४० हजार रुपये अनुदान रोखीने देण्यात आले आहे. तर बँक खात्यावर मिरज तालुक्यातील ५३ हजार ९९३ बाधित कुटपंबांपकी ४९ हजार १४६ कुटुंबांना ४२ कोटी ६७ लाख ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

पलूस तालुक्यातील १५ हजार ८८२ बाधित कुटुंबांपकी १५ हजार ८१३ कुटुंबांना ७ कोटी ९१ लाख ४० हजाररुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यात ५ कोटी ९० लाख ९५ हजार व शिराळा तालुक्यात ३० लाख ६५ हजार अनुदान वितरीत करण्यात आले आहे. ज्या कारणास्तव बँकेकडून लाभार्थींच्या खात्यावर रक्कम वर्ग झालेली नाही त्या संबंधित लाभार्थींच्या याद्या दुरूस्ती करून त्यांच्या खात्यावरही रक्कम तात्काळ जमा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

तात्पुरत्या निवाऱ्यासाठी घरभाडेपोटी ग्रामीण भागातील ८४२५ कुटुंबापकी २२४९ कुटुंबाना ५ कोटी ३९ लाख ७६ हजाररुपये  व शहरी भागातील ३८८ कुटुंबापकी २१६ कुटुंबांना ७७ लाख ७६ हजाररुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.

पूरबाधित कुटुंबांना निर्वाह भत्ता प्रति प्रौढ व्यक्तीस ६०रुपये व प्रति बालकास ४५रुपये या प्रमाणे मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यातील एकूण ८८ हजार ६०० बाधित कुटुंबातील१लाख ७१ हजार १७१ प्रौढ व्यक्ती व ४५ हजार ३३४ बालकांना एकूण १० कोटी ३६ लाख ३७ हजार १००रुपये निर्वाह भत्ता वाटप करण्यात आला आहे.

पूरग्रस्त हस्तकला, हातमाग कारागीर / बारा बलुतेदार अशा १३२४ लाभार्थींसाठी ४ कोटी ८० लाख ४ु२ हजार ४६०रुपये अनुदान वाटप केलेले आहे. यापकी ३१ ऑक्टोबर अखेर ४१ लाभार्थींसाठी तहसिल कार्यालयाकडून ७ लाख ८१ हजार ४७५रुपये अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे.

बारा बलुतेदार, छोटे व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक यांना मानकानुसार १३२४ लाभार्थींसाठी१कोटी ८ लाख ११ हजार ७००रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर अखेर ४१ लाभार्थींसाठी तहसील कार्यालयाकडून २ लाख ७८ हजार ८००रुपये रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थींचीही रक्कम तात्काळ जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.