पेठवडगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रशिक्षणास गरहजर असणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी बुधवारी कारणे दाखवा नोटीस काढली. उमेदवाराच्या बँक खात्यातील मोठय़ा आíथक रकमेची बँक अधिकाऱ्यांनी माहिती घेणे सुरू ठेवले आहे. याची माहिती देणे उमेदवारांना बंधनकारक असल्याने दिवस-रात्र भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने ४७ वाहनांची तपासणी करण्यात आली.
आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी आचारसंहिता कक्षामार्फत भरारी पथक नेमण्यात आले असून पथक प्रमुख एस. जे. जाधव व बळवंत बोरे यांचे मार्फत मंगरायाचीवाडी, गोपाळवाडी, महालक्ष्मी मंदिर, मार्केट यार्ड, इंदिरावसाहत, सिद्धार्थनगर परिसरात दररोज पाहणी करण्यात येत आहे. राजकीय पक्षाच्या सभा, कोपरा सभा, प्रचारफेरी, पदयात्रा बाबतीत आचारसंहिता कक्षाकडून माहिती घेऊन व्हीडीओ शूटिंग करण्यात येत आहे. स्थायी निरीक्षणासाठी दिवसा व रात्री दोन पथके नेमण्यात आली आहेत.
रविवार, दि. १३ रोजी स्थायी निरीक्षण प्रमुख बाळू सानप, व्हीडीओग्राफर संतोष माळवदे व दोन पोलिस कर्मचारी पथकासह शहरातील हातकणंगले रोड, कोल्हापूर रोड, वाठार रोड, भादोले रोडकडून येणाऱ्या ४७ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणुकीत काळ्या पशाला वाटा फुटण्याची शक्यता असल्याने वडगाव शहरातील राष्ट्रीय व शेड्युल्ड बँकेच्या शाखाधिकाऱ्यांची बठक घेऊन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या बँक खात्यातील मोठ्या आíथक व्यवहाराची माहिती सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना १३ नोव्हेंबर रोजी पहिले प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशिक्षणास गरहजर असणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० चे कलम १३४ अनुसार कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या असल्याचे इथापे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2016 1:57 am