आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपाच्यावतीने येथे घेण्यात आल्या. त्याला इच्छुकांचा उस्फू र्त प्रतिसाद मिळाला. माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. ७० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी प्रदेश उपाध्यक्ष  मकरंद देशपांडे व प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी पक्षाच्यावतीने सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.

यानंतर कोल्हापूर जिल्ह्यतील १० विधानसभा मतदार संघातून आलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखती पूर्ण केल्या. मतदारसंघ निहाय मुलाखती दिलेल्यांची नावे याप्रमाणे-कोल्हापूर उत्तर-महेश जाधव, आर. डी. पाटील, चंद्रकांत जाधव,  कोल्हापूर दक्षिण-आमदार अमल महाडिक, राहुल चिकोडे, सुभाष रामुगडे,  इचलकरंजी-सुरेश हाळवणकर, राधानगरी-बाबा देसाई,  नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर,  राहुल देसाई, दीपक शिरगांवकर यांच्यासह अन्य सात, हातकणंगले —  अशोकराव माने, तानाजी ढाले, देवानंद कांबळे यांच्यासह अन्य सात,  शाहुवाडी-राजाराम शिपुगडे,  प्रवीण प्रभावळकर, अजितसिंह  काटकर, अन्य एक, करवीर—  के.एस.चौगले,  पी.जी.शिंदे, संभाजी पाटील,  हंबीरराव पाटील यांच्यासह अन्य ६, चंदगड -गोपाळराव पाटील,  हेमंत कोलेकर,  भरमुअण्णा पाटील,  अशोक चराटी, यांच्यासह अन्य तीन ,कागल — समरजीतराजे घाटगे,  परशुराम तावरे,  शिरोळ-राजवर्धन नाईक—निंबाळकर, अनिलराव यादव, रामचंद्र डांगे,  विजय भोजे अन्य तीन.  उमेदवारांनी आपली विधानसभा निवडणुकीसाठी मुलाखत पूर्ण केली.