18 July 2019

News Flash

कोल्हापूर : सुनेच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; हत्या झाल्याचे उघड झाल्याने खळबळ

सासूवरील मातृवत प्रेमापोटी तिच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

सासूवरील मातृवत प्रेमापोटी तिच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. या प्रकरणात शुभांगी लोखंडे या सुनेने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या आपटेनगरमध्ये शनिवारी हा प्रकार घडला होता. या घटनेमध्ये सासूवरील प्रेमापोटी तिच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला होता. आईच्या निधनामुळे आनंद व्यक्त केल्याने पतीनेच पत्नीची हत्या केली असल्याचे तपासात आता उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पतीवर आम्हाला संशय होता त्यामुळे पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर पती संदीप लोखंडे याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

शनिवारी पहाटे सासू मालती लोखंडे (वय ७०) यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर ४० वर्षीय सुनेने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन जीवनयात्रा संपवल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. यात अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे देखील प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र, शुभांगी यांचा पाय घसरुन त्या पडल्या असाव्यात असे त्यांचा पती संदीप लोखंडे यांनी पोलिसांना सांगितले होते.

First Published on March 13, 2019 5:12 pm

Web Title: a diversion in suicide case happened in kolhapur