कोल्हापूर ते राधानगरी मार्गावर भोगावतीजवळ क्रूझर व डंपरमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर १३ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला आहे. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास डंपरने क्रूझर गाडीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की क्रूझर गाडीचा चेंदामेंदा झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
क्रूझर गाडीत प्रवास करणारे सर्वजण गोकुळशिरगावकडे चालले होते. अपघातग्रस्त गाडीतील सर्व प्रवासी हे पीरळ शिरोली, तारळे कुडूत्री परिसरातील रहिवासी आहेत. अपघातानंतर तात्काळ स्थानिकांनी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2019 12:03 pm